Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

माणिकबाबा विद्यालय शेळगाव येथे व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा यशस्वी समारोप


परंडा प्रतिनिधी / दि.५ माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव येथे श्री शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ शेळगाव, प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुणे आणि पाबळ विज्ञान आश्रम पाबळ यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचा यशस्वी समारोप करण्यात आला.

दि. २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या शिबिरामध्ये एकूण ७५ बेरोजगार व गरजू नवतरुण मुला-मुलींनी सहभाग घेतला. प्रशिक्षणामध्ये खालील विषयांचा समावेश होता —
१️)अग्निशिवाय स्वयंपाक व जाहिरात माहिती
२️) सुतारकाम व इलेक्ट्रिकल यंत्रांची ओळख
३️) परसबाग व्यवस्थापन
 या काळात प्रशिक्षणार्थींनी फर्निचर दुकान भेट, शेतकरी मुलाखत, आणि जाहिरातीचे महत्त्व या विषयांवर सखोल माहिती घेतली.
ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी अशा प्रशिक्षण शिबिरांची मोलाची भूमिका आहे, असे सहभागी विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले व प्रवीण मसाले ट्रस्ट पुणे यांचे आभार मानले.
शिबिराच्या सांगता समारंभात सुहाना व्यवसाय प्रशिक्षण केंद्र शेळगाव तर्फे प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
हा वितरण समारंभ विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग कुमटकर आणि धवलक्रांती दूध संघाचे चेअरमन गजानन शेवाळे यांच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश शिंगाडे यांनी केले, तर शहाजी गरड यांनी उपस्थितांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध