Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

महिलेचा हात धरला व अपशब्द वापरुन तिचा केला विनयभंग


अमळनेर प्रतिनिधी : शौचास जाणाऱ्या महिलेचा हातक्षधरुन तिचा एकाने विनयभंग केल्याची घटना 3 रोजी सायंकाळी साडे सात वाजता पातोंडा येथे दापोरी रस्त्यावर घडली.पातोंडा येथील एक महिला दापोरी रस्त्यावर शौचास जात असताना अरुण दौलत संदानशिव हा आला आणि त्याने रस्ता अडवून महिलेचा हात धरला व अपशब्द वापरुन तिचा विनयभंग केला. महिलेने त्याचा हात झटकला असता अरुण याने महिलेला शिवीगाळ केली व जर कुणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन पळून गेला. महिलेने घरी येऊन ही हकीगत आपला पती आणि जेठाणीला सांगितली. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन अरुण विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74,79 ,351(2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध