Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

पिंप्रीगवळी येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान.



पिंप्रीगवळी प्रतिनिधी - तालुका मोताळा, जिल्हा, बुलढाणा भागातील शेतीशिवारात काल शनिवारला रात्री अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य अवकाळी पाऊस पडल्यामुळे माका, सोयाबीन, कापुस, तूर या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी शेतात माका आणि सोयाबीन पिक काढणीसाठी कापुन ठेवलेले होतें. त्याला आता कोंब फुटायला सुरवात झाली तर काही शेतकऱ्यांचे सोयाबीन व मका रात्री पावसात वाहून गेले.अनेक शेतकऱ्यांचे शेती खरडून गेली अतिशय वाईट परिस्थितीचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.अशा परिस्थिती जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

आधीच कर्जाचा डोंगर डोक्यावर आसुन त्यात भर म्हणून हे झालेलं अतोनात नुकसान कस भरून निघणार.एव्हढं मोठया प्रमाणात नुकसान झालं तरी शासनाचा एकही कर्मचारी पंचनाम्यासाठी गावात आला नाही. आतातरी शासनाने यांची गंभीर दाखल घेऊन लवकर पंचनामे करावे व येथील शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाततुन होतं आहे.यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपतालुका अध्यक्ष  सुनील भामद्रे,अ. ज. तालुका अध्यक्ष अनिल पवार, ग्रा. पं सदस्य बारसु खराटे तसेच गावातील शेतकरी गौरव उबाळे, गजानन पाटील, श्रावण उबाळे, शंकर कुंकुळे,यांनी शेतावर जाऊन पाहणी केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध