Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५

सुनिल महाजन ५०० रूपये च्या स्टँम्प पेपर सत्य प्रतिज्ञापत्र लिहुन देणार


अमळनेर प्रतिनीधी:- सुनिल दयाराम महाजन, आपल्या प्रभाग क्रमांक १३ ब मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्या करिता उभा आहे. मी आज रोजी 500 रुपये च्या स्टॅम्प पेपर वर सत्य प्रतिज्ञापत्र आपणा सर्व वार्डातील लोकांसमोर लिहून देतो की, मी आपल्या वॉर्डात नगर सेवक म्हणून निवडून आल्यास 1 ) नगर पालिकेच्या कोणत्याही कामात ठेकेदार म्हणून ठेका घेणार नाही.2) तसेच माझ्या परिवारातील कोणासही ठेका घेऊ देणार नाही.3) वा माझ्या निकटवर्तीय लोकांकडून माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी ठेका घ्यावयास लावणार नाही.4) या पंच वार्षिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर पुन्हा जर कोणी समोर योग्य निस्वार्थी कार्यकुशल उमेदवार उभा असेल तर नगर सेवक पदाची निवडणूक लढवणार नाही.5) मी दिलेल्या निवडणूक जाहिरनाम्यातील दिलेल्या आश्वासनाचे तंतोतंत पालन करेल.6) आश्वासनांच्या पूर्ती करण्यासाठी आपणा सर्वांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची ग्वाही देतो.7) नगर पालिकेच्या कोणत्याही भ्रष्टाचारात सामील होणार नाही 8) उलट नगर पालिकेतील भ्रष्टाचार ,पैशांच्या अपहारास विरोध करेल व ते उघडकीस आणेल.9) अमळनेर शहरास आपल्या सर्व सामान्य नागरिकांच्या दबाव गट तयार करून स्वच्छ सुंदर अमळनेर शहर निर्माणासाठी सतत झटत राहीन .10) आपल्या वार्डातील तसेच संपूर्ण अमळनेर शहरातील गटारी, रस्ते, सार्वजनिक मुतारी, संडास यांची दुरुस्ती व नियमित सफाई करण्यासाठी कटिबद्ध राहील.11) रस्त्यावरील लाईट लावणे दुरुस्ती करणे,पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी कटिबध्द राहील. 12)आपल्या या कामात कुचराई, असमर्थ आढळल्यास पदाचा राजीनामा देईन.🙏🙏🌹🌹🔥🔥. आपलाच अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 13 ब नगरसेवक पदाचा उमेदवार ..... सुनिल दयाराम महाजन, (स्वेच्छा सेवा निवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल तथा समाजात नव परिवर्तन, व तरुणांमध्ये सकारात्मक विचार पेरणारा, सर्वस्व राष्ट्राला समर्पित करू इच्छिणारा समाज सेवक.). MA इतिहास,BA इतिहास व इंग्रजी,Ded, इतिहास SET, दोनदा Ph.D ची PET परीक्षा उत्तीर्ण .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध