Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५
पोलिसांच्या हातातून पळालेले दोन्ही चोर सापडले
अमळनेर प्रतिनीधी:- तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रचला सापळा
अमळनेर: पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे.
अमळनेर पोलिसांनी शहर व परिसरातून २४ मोटारसायकली चोरणारे हिंम्मत रेहंज्या पावरा वय ३२ व अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खर्डे वय २७ रा सातपिंप्री ता शहादा जिल्हा नंदुरबार याना अटक केली होती. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने २८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जळगाव कारागृहात जागा नसल्याने आरोपीना नंदुरबार जिल्हा कारागृहात जमा करण्याचे आदेश दिले होते. या आरोपीना नंदुरबार येथे नेण्यासाठी अमोल पंडित करडयीकर व यशकुमार रवींद्र सपकाळे या दोघा पोलिसांना वॉरंट देण्यात आले. आरोपीना शासकीय वाहनातून नंदुरबार नेत असताना धावडे गावाच्या पुढे अंबालाल ने मला कसे तरी होतेय म्हणून नाटक केले आणि डोळे बंद केले.
पोलिसांनी हॉटेल नयन समोरील चहाच्या टपरीवर गाडी थांबवून सपकाळे याने खाली उतरून पाण्याची बाटली आणली. अंबालाल च्या डोळ्यावर पाणी मारले तरी तो डोळे उघडत नव्हता म्हणून अमोल करडईकर याने हाताची बेडी उघडून त्याला पाणी पाजायला सुरुवात केली. त्याचवेळी शेजारी बसलेला हिम्मत पावरा हा बेडीसह पळू लागला. त्याला पकडण्यासाठी पोलीस अमोल पलीकडे धावला तोपर्यंत इकडे आजारी चे नाटक करणारा अंबालाल देखील झटका मारून पळू लागला. सपकाळे त्याला पकडायला धावला त्याने त्यालाही झटका मारला व शेतात पळून गेला. इकडे हिम्मत पावरा रस्त्याच्या पलीकडे धावत असतांना त्याला अमोल ने पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दोनदा अमोल च्या हाताला झटके मारून निसटून गेला आणि शेतांमध्ये पळून गेला.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे ,सुनील तेली ,भूषण परदेशी , अमोल कर्डईकर याना तांत्रिक माहिती पुरवत आरोपींच्या शोधासाठी पाठवले. पोलीस पथक तीन दिवसांपासून जंगलात आरोपींचा शोध घेत होते. अंबिलाल च्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. अखेरीस पोलिसांनी अंबिलाल च्या मित्राच्या मोबाईल वर ताबा मिळवला. आरोपी त्याच्या सोबत वावरतांना त्याच्या हालचाली टिपत होते. मात्र पोलीस पकडायला गेले की आरोपी जंगलात पळून जाण्यात यशस्वी ठरत होता. अखेर पोलिसांनी माघारी फिरण्याचे नाटक करून आरोपी व त्याच्या नातेवाईकांना विश्वास निर्माण केला. आणि अंबिलाल बुरड्या खरडे त्याच्या बहिणीकडे रंजाणे गावात असल्याची माहिती मिळताच भल्या पहाटे पोलीस रवाना झाले आणि अंबिलालला अटक केली.
त्याचप्रमाणे दुसरा आरोपी हिम्मत रेहंज्या पावरा याला देखील पोलिसांच्या पथकाने शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथून हॉटेल चुलांगण वरून ताब्यात घेतले आहे. अल्पावधीतच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीना अटक केल्याने त्या दोन पोलिसांवरची नामुष्की टळली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा