Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

प्रभाग क्रमांक ४ चा सर्वांगीण विकास हाच ध्यास!! बीजेपी उमेदवार "मनिषा" राकेश पाटील व "वासुदेव" शंकर देवरे यांची ठाम ग्वाही



शिरपूर प्रतिनिधी – आगामी नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ साठी भाजपच्या उमेदवार "मनिषा" राकेश पाटील व "वासुदेव" शंकर देवरे यांनी विकास हा एकमेव अजेंडा ठेवत दमदार भूमिका मांडली आहे. “प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सुविधा, स्वच्छता, रस्ते, निचरा व मूलभूत विकासाची सोय मिळाल्याशिवाय समाधान नाही. सत्ता आली तर कामच बोलू देऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

नागरिकांशी संवाद साधताना दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित कामांच्या जलद निकालीसाठी ‘शून्य राजकारण—शंभर टक्के विकास’ हा मंत्र जाहीर केला. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, अंगणवाडी-सुविधा, प्रकाशव्यवस्था, अंतर्गत रस्ते व कचरा व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत निर्णायक बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मतदारसंघात सध्या प्रचाराचा जोर वाढत असून, प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप उमेदवारांची विकासाभिमुख भूमिका चर्चेत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध