Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या उमेदवारीला जनतेचा वाढता प्रतिसाद.


अमळनेर प्रतिनीधी:- नगरपरिषदेचे निवडणुकीचे वातावरण तापू लागले असुन अमळनेर शहरात जनतेच्या मनात आनंदाची लाट उसळली आहे. डॉ.परिक्षीत बाविस्कर हे शांत, संयमी, अभ्यासु व्यक्तिमत्वाला संधी दिल्याने जनतेच्या मनात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाल्याने शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या भविष्याच्या विचार करून पाऊले डॉ.परिक्षीत बाविस्कर यांच्या कडून पडतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरातील नागरिकांचा आरोग्यासाठी खुले भूखंड विकसित करून ओपेन जिम, जागिंग ट्रक यासह लहान मुलासाठी खेळणी उपलब्ध करून देऊन खुले भूखंडाचा विकास करण्याचा त्याचा मानस आहे.

डॉ.परीक्षित बाविस्कर हे उच्चविभूषित असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट होणे निश्चित असून म्हणुन जनतेचा त्यांना वाढता पाठींबा मिळत आहे.

शहरातील व्यावसायिक, व्यापारी, नोकरवर्ग, सर्वसामान्य कडून डॉ.परीक्षित बाविस्कारांचे स्वागत होत असुन मतदारांना शिवसेनेच्या रूपाने मिळालेला उमेदवार हा आपल्या कुटुंबातील असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

प्रभाग क्र. १२ पुष्पा पंकज भोई (मोरे) व सुयोग ज्ञानेश्वर धनगर आणि प्रभाग क्र. ४ मधील उमेदवार निता नरेश कांबळे व नावीद शेख यांच्या प्रचाराची शुभारंभ डॉ. बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आला असुन प्रभागात मतदारांनी जोरदार स्वागत करुन डॉ. बाविस्करांना शुभाशिर्वाद देऊन तीन हि धनुष्यबाण निशाणी असलेल्या उमेदवार निवडून देण्याचे सांगितले.

सदर प्रसंगी नाना धनगर, विलास कंखरे, नरेंद्र कांबळे, गुलाम नबी, पंकज चौधरी, राहुल कंजर, अमन सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध