Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५

कन्नड तालुक्यातून नवनविन साहित्यिक घडावेत ॲड.कृष्णा पा.जाधव लक्ष्मण वाल्डे यांच्या कादंबरीचे प्रकाशन



कन्नड (प्रतिनिधी ) कन्नड तालुका हा निसर्ग व ऐतिहासिक , सामाजिक आणि समृद्ध साहित्यिक परंपरा लाभलेला तालुका आहे. कन्नड तालुक्यात तिफणच्या माध्यमातून साहित्य चळवळ वृद्धिंगत होत असून या उपक्रमातून प्रेरणा घेवून अनेक नवोदित लेखक - कविंना प्रेरणा व मार्गदर्शन मिळत आहे. यापुढेही या चळवळीतून उत्तमोत्तम नवोदित लेखक - कवी घडावेत असे प्रतिप्रादन सामाजिक कार्यकर्ते ॲड. कृष्णा पा. जाधव यांनी केले. (ता. २ ) ते पिशोर येथे त्रैमासिक तिफण, तिफण वाचक चळवळ, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड, अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा कन्नड आयोजित तिफण साहित्य संवाद उपक्रमांतर्गत कन्नड तालुक्यातील लेखक - वाचक - पत्रकार स्नेहमेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून ते उपस्थित होते. व्यासपीठावर तिफणकार डॉ. शिवाजी हुसे, डॉ. संजय गायकवाड, भगवानराव लहाने, नाना लहाने, युवा नेते गणेशराव घुगे, लक्ष्मण वाल्डे, यांची उपस्थिती होती. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवर व साहित्यिक, पत्रकार, वाचक यांचे स्वागत शॉल व पुस्पहार देऊन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. शिवाजी हुसे यांनी केले. त्यांनी कन्नड तालुक्यातील साहित्य परंपरा व आगामी वाटचाल , विविध उपक्रम यावर प्रकाश टाकून भूमिका विशद केली, ज्ञानेश्वर गायके यांच्या माझ्या कन्नडच्या भूमित या कविता वाचनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रा. रंगनाथ लहाने ,गणेश घुगे , यांनीही मनोगत व्यक्त केले. पहिल्या सत्रात युवा लेखक लक्ष्मण वाल्डे यांच्या बाळ्या सायकल अम्बुलन्सवाला या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लक्ष्मण वाल्डे यांनी कादंबरी लेखनाची भूमिका व कादंबरीची निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखविली. तिफण वाचक चळवळीमुळे मला लेखनास प्रेरणा मिळाल्याचे सांगून ही कादंबरी प्रेरणा देणारी आहे असे मत व्यक्त केले. नाना लहाने कादंबरीवर भाष्य करतांना म्हणाले की, लक्ष्मण वाल्डे यांची कादंबरी ही शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या एका सामान्य माणसांची असामान्य कहाणी आहे. 

लेखकाने स्थानिक बोली भाषा, विविध घटना प्रसंग आणि वास्तवाचे भान ठेवून या कादंबरीचे लेखन केले आहे. डॉ. संजय गायकवाड यांनीही कादंबरीवर भाष्य केले ते म्हणाले की, पिशोर परिसरातील समाज जीवनाचे चित्रण करणारी ही कादंबरी सामान्य माणसांच्या जिद्दीची व संघर्षाची कर्तृत्वाची गाथा आहे. लक्ष्मण वाल्डे यांनी या कादंबरीसाठी केलेले प्रयत्न व मेहनत या बद्दल त्यांचे अभिनंदन केले. नायब तहसिलदार दिलीप कुमार सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रविण दाभाडे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले. वन भोजनानंतर विविध विषयावर चर्चा, भेटीगाठी, परिचय कार्यक्रम संपन्न झाला. आगामी उपक्रमावर चर्चा झाली, त्यानंतर गाणी, कविता आणि गप्पाची सुरेख मैफल रंगली, यावेळी पुजा चव्हाण, रामेश्वर मोरे, इब्राहिम पठाण, निवृत्ती काळे, ज्ञानेश्वर गायके, दत्ता मोरस्कर, प्रा. अशोक दुधकर, जगन्नाथ जाधव, समृद्धी मोतिंगे, मथुरा काकडे, नागेश लाड, संकेत निकम , आदींनी कवितावाचन केले. या कार्यक्रमास कन्नड तालुक्यातील लेखक, वाचक, पत्रकार, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संयोजन समितीचे अरुण थोरात, संदीप ढाकणे, संदीप वाकडे, श्रीराम दापके, ज्ञानेश्वर गायके, सुरेश औटे, प्रा.केशरचंद राठोड, भगवान लहाने, प्रकाश शहरवाले, ब्रह्मगिरी गोस्वामी, आदींनी परिश्रम घेतले. संदीप वाकडे यांनी सूत्रसंचलन केले. आभार अरुण थोरात यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध