Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३ नोव्हेंबर, २०२५
पिशोर येथे बाळ्या सायकल ॲम्बुलन्सवाला या मराठी ग्रामीण कादंबरीचे प्रकाशन संपन्न...
पिशोर येथे चला जाऊया, कवितेच्या गावा...
आयोजित केलेल्या तिफण स्नेह मेळावा
आयोजक ॲड.कृष्णा काका पाटील जाधव
कादंबरीवर भाष्य नाना लहाने यांनी कादंबरीला पूर्ण न्याय देत आपली जबाबदारी पार पाडली.या आधी १५ नोव्हेंबर २०२३ ला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदानातून बहुरंगी काव्यसंग्रह प्रकाशित. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अयशस्वी माणसाची यशस्वी कहाणी... फळाची अपेक्षा न करता कर्म करणाऱ्या ध्येयवेढ्या माणसाची ही कहाणी... स्वतःच्या आयुष्याचा मार्ग स्वतः बनवणाऱ्या संघर्षकाराची ही कहाणी... या कादंबरीत ग्रामीण भागाच्या वेदना, ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसांच्या जीवनाचा खडतर प्रवास मांडलेल्या आहे... ही कादंबरी पिशोर व पिशोर परिसरावर आधारित आहे . याच ग्रामीण कादंबरीचे पिशोर येथे बाळ्या सायकल ॲम्बुलन्सवाला या मराठी ग्रामीण कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी उपस्थित त्रैमासिक तिफण, तिफण वाचक चळवळ, भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड, अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा कन्नड चे तिफणकार डॉ.प्रा.शिवाजी हुसे, नायब तहसीलदार दिलीप कुमार सोनवणे, डॉ.प्रा.संजय गायकवाड,युवा नेते गणेश घुगे,रंगनाथ लहाने आदीच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन झाले.प्रवीण दाभाडे , ज्ञानेश्वर गायके,संदीप वाकडे, श्रीराम दापके,अनिल भडगे, डॉ.प्रा.केशरचंद राठोड ,संदीप ढाकणे, दत्ता मोरस्कर,भगवान लहाने , प्रकाश शहरवाले,अरुण थोरात, जगन्नाथ जाधव, अशोक दुधकर ,सुरेश औटे, निवृत्ती काळे, आदींनी पुढील साहित्यिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा