Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५

चिमठाणे ते दलवाडे प्र. सो अमराळे रस्त्याचे काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे सामाजिक कार्यकर्ता सोनू फौजी सह गावकर्यांचा आंदोलनाचा इशारा....



चिमठाणे -प्रतिनिधी -प्रविण भोई /
सरकार रस्त्यांच्या कामावर करोडो रुपयांचा निधी मंजूर करून विकासाच्या वाटेला नेत आहे.मात्र त्या रस्त्यांच्या कामाची गुणवत्तेच काय गुणवत्ता कोण ठरवेल? होणारे रस्ते गुणवत्ता पूर्ण आहेत की नाही याची चौकसी व शहाणीशा कोण करेल? कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवून बिले काढून मोकळे होतात. आणि ते काही दिवसात निकृष्ट कामाची दयनीय अवस्था व दुर्दशा होते.याची झळ मात्र सर्वसामान्यांना बसते तसाच प्रकार चिमठाणे दलवाडे प्र.सो या रस्त्याची बघायला मिळाला सदर. रस्त्याचे काम दीड ते दोन वर्षांपासून रखडलेले होते आणि सदर कामाला सुरवात झाली. मात्र त्या कामाचे गुणवत्ता शून्य काम होताना दिसत आहे. चिमठाणे ते दलवाडे प्र. सो ते अमराळे रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे होत आहे असून .सदर रस्तावर नेहमी मोठ्या प्रमाणात रहदारी असते शेतकरी तसेच विद्यार्थी सह रात्री उशिरापर्यंत या रस्त्याने वापर सुरू असतो तसेच हा अनेक खेडे गावांना जोडला जाणारा रस्ता आहे.

अनेक दिवसांपासून हे काम निधी अभावी बंद होते परंतू चिमठाणे पासून दलवाडे प्र.सो पर्यत तसेच अमराळे कडे जाणारा रस्तावर खोद काम न करता खडी व डांबर टाकून रस्त्याच्य काम नित्कृष्ठ दर्जाचे करण्यात येत आहे.यामुळे सर्व खेडे गावातील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.रस्त्याच्या कामाचा निधी कोटी रुपयांपर्यंत असून शासनाने दिलेला निधी सदर ठेकेदार व इंजिनियर यांनी मनमानी कारभार चालवला असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कामात होत असून कामाचा दर्जा अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे दिसून येत आहे.सदर कामात खडी डांबर टाकून वरच्या वर टाकून सदर रस्त्याचे काम होतं आहे.कुठल्याही प्रकारचे मशीच्या सहाय्याने हे काम होत नसून ह्या कामाची कॉलिटी देखील चेक करणे गरजेचे आहे.तसेच काम बंद करून चागल्या पध्दतीने काम केले पाहिजे अशी नागरिकांची मागणी होत आहे. 

तसेच साइड पट्या वर मातीची भर केली जात असून साईड पट्टी मुळे रात्री अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नागरिकांनी अनेक वेळा ठेकेदाराला सांगितले असता ठेकेदार ने नागरिकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून काम सुरू केले आहे.बाकीच्या ठिकाणी अक्षरशः खडी वरती दिसत असून डांबर चे प्रमाण खूपच कमी प्रमाणात दिसून येत आहे.यामुळे देखील वाईट अवस्था या रस्त्याची झाली आहे. सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून या कामाचे कुठल्याही प्रकारचे बिल निघू न देता कार्यवाही करण्याची मागणी चिमठाणे गावाचे भूमीपुत्र सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील तसेच चिमठाणे परिसरातील नागरिकांनी केले आहे. सदर काम चागल्या पध्दतीने न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील व नागरिकांनी जनअदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सदर ठेकेदारावर व इंजिनीअर यांच्या वर शासन कुठल्या प्रकारे कार्यवाही करते की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध