Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५

शिरपूर पोलीसांचा दमदार कारवाई !! आर्टिगा कार, रोख २०,००० रुपये व मोबाईल हिसकावणाऱ्या दोन दरोडेखोरांना फक्त ४ तासांत गजाआड



शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर शहरात दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवत ड्रायव्हरला मारहाण करून २०,००० रुपये, मोबाईल व आर्टिगा कार लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास फक्त चार तासांत उकलत शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या डी.बी.पथकाने दोन आरोपींना शिताफीने गजाआड केले.

घटनेचा तपशील :

फिर्यादी जहांगिर खान दिलदार खान (वय ३५, रा. मालेगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मालेगावहून आलेल्या त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या आर्टिगा कार (क्रमांक MH-04/FZ-7737) जवळ तिघा अनोळखी इसमांनी हल्ला चढवला. त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून फिर्यादीकडून २०,००० रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला, तर दुसऱ्याने कारची चावी काढून घेतली. तिसऱ्या आरोपीने थेट कार चालवत तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. या तिघांनी नंतर फिर्यादीच्या भावाला फोन करून “५०,००० रुपये दिल्यासच कार परत मिळेल” अशी धमकी दिली.

पोलीसांची झटपट कारवाई :

फिर्यादीनंतर पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांनी डी.बी. पथकाला तत्काळ हालचालीचे आदेश दिले. शिंदखेडा, नरडाणा, शहादा व शिरपूर परिसरात वेगवेगळी चार पथके रवाना करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक दिपक कुशारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपींची कार रामसिंग नगर परिसरात आर.सी. पटेल शाळेजवळ उभी असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.

तपासात आरोपींची नावे
1️⃣ राकेश रावण कोळी (वय २९)
2️⃣ विजय सुरेश निकुंभे (वय ३०, रा. गुजरखडे, ता. शिरपूर) अशी असल्याचे उघड झाले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून खालील माल जप्त करण्यात आला आहे. 

जप्त मालमत्ता:

▪️ पांढऱ्या रंगाची आर्टिगा कार (किंमत ₹५,००,०००)
▪️ रोख ₹२०,०००/-
▪️ मोबाईल फोन (किंमत ₹१०,०००/-)
▪️ एक धारदार चाकू
एकूण किंमत : ₹६,३०,०००/-

आरोपींची पूर्वइतिहास तपासात उघड :

आरोपी विजय निकुंभे याच्यावर आधीच शिरपूर पोलीस ठाण्यात खालील गुन्हे दाखल आहेत :
1️⃣ गु.र.नं. ११३/२०२५ – भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८ नुसार
2️⃣ गु.र.नं. १३/२०१४ – भा.दं.वि. कलम ३७९ नुसार

कारवाईत सहभागी अधिकारी व पथक :

ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी :
पोनि किशोरकुमार परदेशी, पोउनि दिपक कुशारे, पोहेकॉ राजेंद्र रोकडे,रद्रि आखडमल, अनिल सोनार, योगेश दाभाडे, विनोद आडमल, गोविंद कोळी, भटु साळुंके, आरीफ तडवी, मनोज महाजन, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, सचिन बाघ, गोपाल माळी, भुपेश गांगुर्डे आदींनी विशेष पराक्रम गाजवला.

शेवटचा निष्कर्ष :

शिरपूर शहर पोलीसांनी दाखवलेली तत्परता आणि शिताफी ही पोलीस दलाच्या कार्यक्षमता आणि जनतेच्या सुरक्षेवरील विश्वास दृढ करणारी ठरली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध