Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

संगिता दिनेश पाटील ह्या आमागी निवडणुकीत जिल्हा परिषद दहिवद-कन्हेरे गटासाठी इच्छुक आहेत.


अमळनेर प्रतिनीधी:- 
सामाजिक बांधिलकी आणि उच्चशिक्षणाच्या जोरावर दहिवद जि. प. गटासाठी संगिता पाटील इच्छुकट

 आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा अर्थात आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेने लोकआग्रहाखातर दहिवद येथील दिनेश सुरेश पाटील यांच्या सौभाग्यवती संगिता दिनेश पाटील ह्या आमागी निवडणुकीत जिल्हा परिषद दहिवद-कन्हेरे गटासाठी इच्छुक आहेत.

  दिनेश पाटील हे स्वत: उच्च शिक्षित असून किमया ग्रुप फर्टिलायझर कंपनीत ते व्हॉइस प्रेसिडेंट आहेत. त्यांचे कार्य भारतभर असून ते २०२१ ते २०२२ दरम्यान भारतीय कृषि अनुसंधान परिषद, कृषि कल्याण मंत्रालय, भारत सरकार (नवी दिल्ली)चे सदस्य होते. एवढ्या मोठ्या हुद्यावर असूनही त्यांनी गावाशी जुळलेली नाळ कायम ठेवली. त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठा ठसा उमटविला आहे. २०१९ मध्ये दहिवद ग्रामपंचायत निवडणुकीत ते सह पॅनल प्रमुख होते  आणि याचवेळी सुषमा वासुदेव देसले यांच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच निवडीसाठी त्यांचा सिंंहाचा वाटा होता.  शिवाय २०२२ मध्ये ते विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत ते पॅनल  प्रमुख होते.

   सामाजिक कार्याची आवड म्हणून त्यांनी २००६-०७ मध्ये तीन गरजू मुलींच्या नावे फि क्स डिपॉजिट ठेवून त्यांच्या शिक्षणाला मोठा हातभार लावला आहे. नवभारत माध्यमिक विद्यालयाच्या काही गरजू विद्यार्थ्यांनादेखील आजोबांच्या नावे फिक्स डिपॉजिट ठेवून त्यातून मिळालेले व्याजाचे पैसे स्कॉलरशिप रुपाने दिले आहेत. दहिवद न्यू प्लॉट भागात स्वखर्चाने पाण्याची टाकी उभारून त्या भागातील ग्रामस्थांची सुमारे १० वर्षांपासून पाण्याची समस्या कायमस्वरुपी संपुष्टात आणली. गावातील जि.प. शाळा सुशोभिकरण, अद्ययावत शैक्षणिक साहित्य आदी गोष्टींसाठी त्यांची आर्थिक मदत नेहमीच असते. शिवाय दहिवद सह निमझरी, सोनखेडी, ढेकू आदी पंचक्रोशितील गावांतील जुने मंदिरे, विविध समाजाचे पंचमंडळे, समाजभवन यांच्या जिर्णोद्धारासाठी त्यांचा हिरहिरीने सहभाग असतो. दहिवद विकास मंचाचे ते सक्रिय सदस्य असून पाणलोट क्षेत्र विकासासाठी त्यांचे मोठ कार्य आहे. दहिवद येथील गरीब व निराधार महिलांना त्यांनी काशी दर्शन घडवून मोठा आशिर्वाद मिळविला आहे. अर्थात ते कर्तव्यासाठी संपूर्ण भारतभर जरी फिरत असतील तरी त्यांनी गाव व परिसरातील ग्रामस्थांशी सामजिक तेची आणि आपुलकीची नाळ कधीही तुटू दिली नाही. विशेष म्हणजे दिनेश पाटील यांचे आजोबा देविदास झुलाल पाटील हे न्यायप्रिय होते आणि त्यांचेही सामाजिक कार्य उल्लेखनीय होते. त्यांचाच वारसा दिनेश पाटील चालवत आहेत..

 या कार्याची दखल घेत दिनेश पाटील यांना २०२२ मध्ये खान्देश कोहिनूर पुरस्कार मिळालेला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत हा पुरस्कार केवळ प्रसिद्ध मराठी संगितकार हृदयनाथ मंगेशकर आणि प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांना मिळालेला आहे. त्यांच्यानंतर हा बहुमान दिनेश पाटील यांना मिळाला आहे.

  दिनेश पाटील यांच्या सौभाग्यवती संगिता पाटील ह्यादेखील उच्चशिक्षित असून त्यांनी इंजिनिअरिंग आणि एम. ए. (इंग्लिश) पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्या सद्या किमया अ‍ॅग्रो सोल्युशन प्रा. लि. कंपनीत (पूणे) संचालिका आहेत. संगिता पाटील यांचा पतीच्या सामाजिक कार्यात सिंंहाचा वाटा आहे. दहिवद येथे सुरू असलेल्या मनरेगा अंतर्गत वृक्षारोपणात रोजंदारीने काम करणाऱ्या ५२० महिलांना नेहमी त्यांचे मार्गदर्शन लाभून प्रेरणा मिळत असते. गावातील प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा हिरहिरीने सहभाग असतो. मनमिळावू व हसमुख स्वभावाने त्यांनी प्रत्येकाच्या मनात घर निर्माण केले असून जि. प. दहिवद-कन्हेरे गटातून त्यांना निवडणुक लढविण्यासाठी नागरिकांचा प्रचंड आग्रह होत आहे.

   राजकीय स्वार्थासाठी नाही तर लोकाग्रहाखातर आणि शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी व्हावा या उद्देशाने ते निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत. शिक्षणाचा, स्वभावाचा आणि सामाजिक कार्याचा जसा कंपनीला फायदा होत आहे, तसाच या गुणांचा फायदा समाजासाठी व्हावा हाच त्यांचा मानस आहे.

   पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक  तंत्रज्ञानाच्या साह्याने परिसरातील शेतीचा विकास कसा होईल?, कापूस, मका या पिकांबरोबरच फळबाग, भाजीपाला आदी पिके कसे घेतले जातील यावर त्यांचा मोठा भर आहे, जेणेकरुन गटातील सर्वच शेतकरी हे आर्थिक संपन्न होतील.

  अशा या उच्चशिक्षित आणि सामजिकतेची जाण असलेल्या उमेदवाराला आपल्या सेवेची सेवेची संधी द्यावी, असे विनंतीवजा आग्रही आवाहन करण्यात येत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध