Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २४ डिसेंबर, २०२५
Home
/
/
‘थर्ड फर्स्ट’ची नशा महागात पडणार!! धिंगाणा, दारू, जुगार अन् बेफिकीरपणाला पोलीस प्रशासनाचा चाप — नियम मोडाल, तर नववर्षाची पहिली रात्र थेट कोठडीतच!!
‘थर्ड फर्स्ट’ची नशा महागात पडणार!! धिंगाणा, दारू, जुगार अन् बेफिकीरपणाला पोलीस प्रशासनाचा चाप — नियम मोडाल, तर नववर्षाची पहिली रात्र थेट कोठडीतच!!
नववर्षाच्या स्वागतासाठी शहर व परिसरात ‘थर्ड फर्स्ट’च्या रात्री सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या, धिंगाणा घालणाऱ्या तसेच कायदा-सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष नाकाबंदी, गस्त आणि तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकांत, प्रमुख रस्त्यांवर तसेच संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या वाहनचालकांची कसून चौकशी केली जाणार असून मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
अवैध धंदे आणि जुगार अड्ड्यांवर कारवाई
महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, बिंगो पार्टी, पत्ते खेळ यांवर छापे टाकून कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून पुनरावृत्ती केल्यास कठोर शिक्षा होणार आहे.
रात्रीची गस्त, नाकाबंदी कडक
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३२ अंतर्गत संशयास्पद व्यक्ती, वाहनांची तपासणी केली जाणार आहे. रात्री उशिरा अनावश्यक फिरणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारी तडीपार
शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १७ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. नववर्षाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा नववर्ष आनंदात, शांततेत आणि सुरक्षिततेत साजरे करावे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा