Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १४ डिसेंबर, २०२५
दोन मोटरसायकलची समोरासमोर एक जण जागीच ठार
अमळनेर प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाजता तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ घडली. नरेंद्र प्रेमराज पाटील रा घुमावल ता चोपडा हा आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 19 बी ए 7986 वर अमळनेर येथे पैलाड भागातील राजेंद्र पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला आला होता. सकाळी साडे अकरा वाजेला तो भेटून चोपडा येथे काम असल्याने परत चोपडा कडे जाण्यासाठी निघाला असताना दुपारी 12 वाजेच्या सुमारास चोपडा कडून अमळनेर येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच 19 ई सी 2213 हिच्याशी समोरासमोर धडक झाल्याने दोन्हीही खाली पडले. नरेंद्र जागीच ठार झाला होता तर समोरील अज्ञात चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने वाहनात घालून पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना केले. नरेंद्र याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमळनेर पोलीस स्टेशनला नरेंद्र याचा चुलत भाऊ किशोर मोहन पाटील याने फिर्याद दिल्यावरुन अज्ञात मोटरसायकलस्वार विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 125 (अ), 125 (ब),324 (4) , मोटरवाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा