Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ डिसेंबर, २०२५
गांधली गावाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला
अमळनेर : तालुक्यातील गांधली येथील १० रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ रोजी विहिरीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली.
गांधली येथील जयश्री संजय संदानशिव वय १८ ही बारावीत शिकणारी तरुणी १० रोजी दुपारी कोणालाच काही एक न सांगता घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या घरच्यांनी तिच्या नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. १२ रोजी दुपारी १२ वाजता जयश्रीच्या वडिलांना सुनील पाटील यांचा फोन आला की गांधली येथीलच धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एक मुलीचा मृतदेह दिसून येत आहे. तिच्या अंगावर काळ्या रंगाची ओढणी दिसून येत आहे तुम्ही येऊन खात्री करा. तिच्या वडिलांनी खात्री केली असता तो मृतदेह जयश्रीचा असल्याचे समजले. मुलीच्या वडिलांनी खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील गांधली येथील १० रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ रोजी विहिरीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. गांधली येथील जयश्र...
-
अमळनेर :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाजता तालुक्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा