Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ डिसेंबर, २०२५

समाजसेवेचे आदर्श नेतृत्व :आदर्श ग्राम कोपर्लीचे शिल्पकार श्री. विनोदतात्या वानखेडे

  
          
या आधुनिक युगातील मानवतेच्या दीर्घ प्रवासात काही व्यक्तिमत्त्वे अशी घडतात, जी स्वतःच्या सुख-दुःखाच्या चौकटीपलीकडे जाऊन संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य समर्पित करतात. “माझं काय?” या मर्यादित विचारांऐवजी “आपलं काय?” या व्यापक भावनेतून ज्यांचे जीवन आकार घेतं, अशी माणसं समाजासाठी दीपस्तंभ ठरतात. नंदुरबार जिल्ह्यातील आदर्शग्राम कोपर्लीचे सर्वेसर्वा, समाजहितासाठी अहोरात्र झटणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणजेच श्री. विनोद तात्या वानखेडे.

साधेपणात दडलेली नेतृत्वाची ताकद :
        
गावातील प्रत्येक समस्या, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक गरजेसाठी ते धावून गेले. लोकांनी त्यांना नेता बनवले, कारण त्यांनी स्वतःला कधीही नेता समजले नाही; तर सेवक म्हणूनच समाजात वावरले. कोणताही दिखावा न करता, शांतपणे पण ठामपणे आपले कार्य करणं ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या डोळ्यांत नेहमी गावासाठी काहीतरी नवीन, सकारात्मक आणि दूरगामी करण्याची तळमळ दिसून येते.

         
 “गावाचं भलं, समाजाचा विकास आणि माणसामाणसातील आपुलकी” हेच ज्यांचे जीवनध्येय आहे, असे विनोद तात्या वानखेडे हे खऱ्या अर्थाने जनतेच्या हृदयात वसणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे जीवन म्हणजे समाजसेवेचा एक जिवंत आदर्शच होय. साधेपणा, नम्रता, प्रामाणिकपणा आणि वेळेचे काटेकोर पालन हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू आहेत. पद, प्रतिष्ठा, मान-सन्मान किंवा प्रसिद्धी यापेक्षा जनतेच्या अडचणी सोडवणे हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय मानले आहे. हणूनच ते कधीही पदासाठी धावले नाहीत.

समाजकार्याचा मजबूत आधारस्तंभ....
              
एक सामाजिक व्यक्ती नसून समाजासाठी एक विश्वासाचं केंद्र आहेत. गोरगरीब, शेतकरी, कामगार, महिला, वृद्ध आणि उपेक्षित घटकांचा बुलंद आवाज बनून त्यांनी अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे भूमिका घेतली. समाजात घडणाऱ्या अन्यायकारक घटनांवर त्यांनी वेळोवेळी ठामपणे आपली भूमिका मांडली आणि अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर राहणे हेच त्यांच्या जीवनाचे व्रत बनले आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता, निःस्वार्थपणे मदतीचा हात देणं हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यामुळेच अनेकांसाठी ते केवळ सामाजिक कार्यकर्ते नसून, संकटसमयी धावून येणारा आपलासा माणूस ठरले आहेत.

युवा पिढीचे प्रेरणास्थान...

आजच्या तरुण पिढीसाठी विनोद तात्या हे खरे आदर्श आणि प्रेरणास्रोत आहेत. समाजकारण, शिक्षण, संस्कार, कर्तव्यभावना आणि प्रामाणिक जीवनमार्ग याबाबत ते तरुणांना सातत्याने योग्य दिशा दाखवतात. “स्वतःचा विकास करताना समाजाचे ऋण विसरू नका” हा संदेश ते केवळ बोलून नव्हे, तर स्वतःच्या कृतीतून देतात. त्यामुळेच अनेक तरुणांच्या मनात विनोद तात्या म्हणजे विश्वासाचं, मार्गदर्शनाचं आणि प्रेरणेचं प्रतीक बनले आहे. त्यांच्या विचारांमुळे तरुण पिढी समाजाभिमुख, जबाबदार आणि संवेदनशील बनत आहे.

मदतीचा सतत उघडा दरवाजा......

आज गावात कुणाला वैद्यकीय मदतीची गरज असो, कुणाला शिक्षणासाठी आर्थिक आधार हवा असो, कुणाला शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असो किंवा कुणाला न्यायासाठी मार्गदर्शन हवे असो—प्रत्येक वेळी विनोद तात्या स्वतः पुढाकार घेऊन मदतीचा हात देतात. “मदत मागणारा कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ नये” हा त्यांच्या कार्याचा मूलमंत्र आहे.
त्यामुळेच ते केवळ एक व्यक्ती न राहता गावातील असंख्य कुटुंबांसाठी आधारवड बनले आहेत. त्यांच्या एका शब्दाने अनेकांचे आयुष्य सावरले आहे, तर त्यांच्या एका कृतीने अनेकांच्या जीवनात आशेचा नवा प्रकाश निर्माण झाला आहे.

राजकारणापेक्षा समाजकारणाचे पुरस्कर्ते...

राजकारणा पलीकडे प्रगतीशील आणि मूल्याधिष्ठित समाजकारणाला महत्व देणे हीच त्यांची मोठी ताकद आहे. स्वतःचे गावातील राजकिय पॅनल असून शांतता संयमाने अस्तित्वाचा झेंडा त्यांनी रोवला.
“पद नव्हे, तर लोकसेवा हाच खरा धर्म” — हे ब्रीद त्यांनी शब्दांत नव्हे तर कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची भावना त्यांच्या प्रत्येक कार्यातून स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या निःस्वार्थ सेवेमुळे काहींना ते जरी जिव्हारी लागले असले, तरी सत्य आणि सेवेचा मार्ग त्यांनी कधीही सोडलेला नाही. कारण त्यांचा विश्वास व्यक्तीवर नव्हे, तर मूल्यांवर आहे.

गावाच्या सर्वांगीण विकासासाचे ध्येय....
            
गावातील महिलांसाठी विशेष कार्यक्रम. वृद्ध, निराधार, अपंग आणि गरजू घटकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. व्यावसायिक संकल्पना,
घरकुल योजना,विविध शासकीय योजना, मदतकार्य, सन्मान कार्यक्रम आणि मार्गदर्शन उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास वाढवला. गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती किंवा सुविधा नव्हेत, तर माणसांचे जीवनमान उंचावणे. हा विचार त्यांच्या कार्यामागे सदैव राहिला आहे. हे कार्य म्हणजे जिल्हा भोई समाज आणि कोपर्ली गावासाठी उचललेला एक मोठा सामाजिक विडा आहे.

एक जिवंत आदर्श....
 
समाजशील कार्यामुळे अनेक कुटुंबांच्या, आयुष्यात आशेचा नवा किरण उजळला आहे. निःस्वार्थ समाजसेवक, संवेदनशील माणूस आणि लोकांच्या मनात आपुलकीने स्थान मिळवलेला दयाळू नेता असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. समाजासाठी झटणारे, जनतेसाठी जगणारे आणि लोकांच्या मनावर राज्य करणारे खरे लोकसेवक  विनोद तात्या वानखेडे आपणास वाढदिवसाच्या आरोग्यदायी सुखमय अन् आनंददायी शिवमय खूप खूप शुभेच्छा अन् उदंड आयुष्याचा अनंत सदिच्छा दादा श्री! 

        संकलन :
✍️ दिपक सुमन पंडित साटोटे
      प्रबोधनात्मक युवा लेखक 
      समुदाय आरोग्य अधिकारी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध