Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ जानेवारी, २०२६
नळदुर्गच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत चमकदार कामगिरी...
नळदुर्ग दि. १ येथील फिनिक्स जि-चॅम्प अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांनी दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सोलापूर येथे आयोजित नॅशनल लेव्हल जि-चॅम्प अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये दैदिप्यमान यश संपादन करत नळदुर्ग शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटवला आहे. देशभरातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत फिनिक्स जि-चॅम्पच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची ठळक छाप पाडली.
या राष्ट्रीय स्पर्धेत क्लासच्या तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी नॅशनल अबॅकस चॅम्पियन, तर एका विद्यार्थ्याने नॅशनल अबॅकस विनर होण्याचा मान पटकावला.
स्पर्धेत:-
🔹 आस्तिक सतीश खांडेकर याने उत्कृष्ट गणनाशक्ती, अचूकता व वेगाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक,
🔹 प्रेम प्रतापसिंग हजारे याने सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक,
🔹 तर शशांक संतोष धोत्रे याने प्रभावी कामगिरी करत नॅशनल अबॅकस विनर होण्याचा बहुमान मिळवला.
राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभात मानाचे प्रमाणपत्र, आकर्षक ट्रॉफी व मेडल देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी मनोगत:-
आस्तिक सतीश खांडेकर म्हणाला,
“राज्यस्तरीय स्पर्धेत काही गुणांनी अपयश आल्यानंतर फिनिक्स जि-चॅम्प अबॅकस क्लासचे संचालक सुरज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक मेहनत घेतली. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच मला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवता आला.”
प्रेम प्रतापसिंग हजारे म्हणाला,
“राज्यस्तरावर ‘जि-चॅम्प सुपरस्टार’ झाल्यानंतर सरांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी सातत्याने मार्गदर्शन केले. नियमित सरावामुळे मला राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळाला.”
अबॅकस विनर ठरलेल्या शशांक संतोष धोत्रे यानेही क्लासमधील शिस्तबद्ध प्रशिक्षण व सकारात्मक वातावरणामुळेच हे यश मिळाल्याचे सांगितले.
पालकांचा समाधानकारक अभिप्राय:-
विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, फिनिक्स जि-चॅम्प अबॅकस क्लासमुळे मुलांमध्ये गणिताची भीती दूर झाली असून आत्मविश्वास, एकाग्रता व शिस्त वाढली आहे. सरांचे मार्गदर्शन अभ्यासपूर्ण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिक्षकाचे उल्लेखनीय योगदान:-
या घवघवीत यशामागे क्लासचे संचालक सुरज कांबळे सर यांचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे, त्यांना यापूर्वी सलग दोन वेळा “बेस्ट अबॅकस टीचर अवॉर्ड” मिळाला असून, यंदा सलग तिसऱ्यांदा “बेस्ट अबॅकस टीचर” म्हणून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षकवर्ग व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात नळदुर्गमधील विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
अबॅकस शिक्षणाचे महत्व :-
✔️ बालकांच्या सुप्त मानसिक क्षमतांचा विकास
✔️ गणिताची भीती दूर होऊन आवड निर्माण
✔️ वेगवान व अचूक मनगणित क्षमता
✔️ उजवा व डावा मेंदू दोन्हीचा संतुलित विकास
✔️ हसत-खेळत शिक्षणामुळे १००% प्रतिसाद
✔️ शालेय अभ्यासात लक्षणीय सुधारणा
काय आहे अबॅकस?
✔️ पाच हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन गणिती साधन
✔️ कॅल्क्युलेटरपेक्षा जलद आकडेमोडीची क्षमता
✔️ विजेविना चालणारे, मण्यांच्या रचनेचे साधन
📞 ऑनलाइन व ऑफलाइन अबॅकस बॅचसाठी संपर्क :
8830331683 – (संचालक : सुरज कांबळे )
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या क...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा