Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २ जानेवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील हाळाखेळ RTO चेक नाक्यावर लुटमारीचा नवा पॅटर्न? ओव्हरलोड वाहनांकडून पैसे उकळणारे ‘पटर’ कोण ?
शिरपूर तालुक्यातील हाळाखेळ RTO चेक नाक्यावर लुटमारीचा नवा पॅटर्न? ओव्हरलोड वाहनांकडून पैसे उकळणारे ‘पटर’ कोण ?
शिरपूर प्रतिनिधी- तालुक्यातील हाळाखेळ RTO चेक नाका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ठिकाणी ओव्हरलोड वाहनांवर कायदेशीर कारवाईऐवजी थेट ‘सेटलमेंट’चा नवा पॅटर्न सुरू असल्याचे गंभीर आरोप वाहनचालकांकडून होत आहेत.वाहन ओव्हरलोड असल्याचे कारण सांगत चालकांना अडवले जाते, मात्र नियमाप्रमाणे दंड, पावती किंवा लेखी कारवाई न करता काही ‘पटर’ मार्फत थेट रोख रक्कम घेतली जात असल्याचा आरोप समोर येत आहे.
विशेष म्हणजे, हे पटर नेमके कोण? ते RTO चे कर्मचारी आहेत की बाहेरील दलाल? याबाबत मोठे गूढ निर्माण झाले आहे.
नियमांची अंमलबजावणी की उघड लुट?
RTO चेक नाक्याचा उद्देश रस्ते सुरक्षितता, नियमांची अंमलबजावणी आणि अपघात रोखणे हा आहे. मात्र येथे नियमांपेक्षा पैशालाच जास्त महत्त्व दिले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
जर वाहन खरोखरच ओव्हरलोड असेल तर अधिकृत दंडाची पावती का दिली जात नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की संगनमत? या प्रकारामुळे RTO प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की संपूर्ण प्रकारात कुणाचे तरी संगनमत आहे? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.चालकांमध्ये भीतीचे वातावरण दररोज प्रवास करणारे ट्रक, डंपर व मालवाहू वाहनचालक दहशतीच्या वातावरणात पैसे देण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे. तक्रार केली तर वाहन अडवले जाईल, दंड वाढवला जाईल या भीतीने अनेकजण गप्प बसत आहेत.
तातडीने चौकशीची मागणी
हाळाखेळ RTO चेक नाक्यावर सुरू असलेल्या या कथित गैरप्रकारांची
जिल्हाधिकारी, परिवहन आयुक्त व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा ‘चेक नाका’ नव्हे तर ‘वसुली नाका’ अशीच ओळख कायम राहील!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही दिवसांत दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा