Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ जानेवारी, २०२६
धुळे जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस पाटील तुमडु वाडीले यांचा विशेष सन्मान
वर्षी प्रतिनिधी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पोलीस पाटील मेळावा – सन २०२६ मध्ये नरडाणा पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असलेले पोलीस पाटील श्री. तुमडु भटु वाडीले यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. नरडाणा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा रजिस्टर नंबर ५६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) अन्वये नोंदविण्यात आलेल्या प्रकरणातील पीडिता रत्ना बुधा भिल (वय १६ वर्षे) हिला कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून सुरक्षितपणे परत आणण्यात पोलीस पाटील तुमडु वाडीले यांनी मोलाची भूमिका बजावली.
या प्रकरणाची माहिती त्यांनी तात्काळ नरडाणा पोलीस ठाण्यास दिली व तपासी अंमलदारांसोबत प्रत्यक्ष जाऊन पीडितेचा शोध घेतला. तसेच आरोपीस पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाला महत्त्वपूर्ण सहकार्य केले. त्यांच्या या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलगी सुखरूप परत येऊ शकली.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हास्तरीय मेळाव्यात त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक करत भविष्यातही असेच समाजोपयोगी कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा