Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ जानेवारी, २०२६
Home
/
/
महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२६ सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते जगदीश मोरे यांना उद्योग सन्मान पुरस्कार
महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२६ सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते जगदीश मोरे यांना उद्योग सन्मान पुरस्कार
शिरपूर प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा “महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार २०२६” हा प्रतिष्ठित पुरस्कार सुदाम मुव्हीजचे संचालक जगदीश मोरे (शिरपूर) यांना प्रदान करण्यात आला आहे.
भव्य पुरस्कार सोहळा
दि.२४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. उद्योजकता, नवकल्पना आणि उत्कृष्ट कार्याचा सन्मान करणाऱ्या या पुरस्काराचे वितरण मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
जगदीश मोरे यांनी उद्योग क्षेत्रात आपल्या कल्पकतेच्या जोरावर वेगळा ठसा उमटवला आहे. व्यवसायातील प्रामाणिकपणा, नाविन्यपूर्ण उपक्रम, तसेच युवकांना रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत राज्यस्तरीय समितीमार्फत त्यांची निवड करण्यात आली.या पुरस्कारामुळे शिरपूर तालुक्याचा गौरव वाढला असून, नवउद्योजकांसाठी जगदीश मोरे हे एक आदर्श ठरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल उद्योग क्षेत्रातून तसेच सामाजिक व राजकीय स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र उद्योग क्षेत्राच्या प्रगतीसाठी कार्य करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवकल्पनांना चालना देणे व उत्कृष्ट कार्याची दखल घेणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश असून, यावर्षी सुदाम मुव्हीजच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जगदीश मोरे यांची निवड होणे ही अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या गौरवामुळे शिरपूरसह संपूर्ण धुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा