Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

चोपडा पोलीस उपविभाग जिल्ह्यात अव्वल – ‘नंबर वन’चा मान पटकावला!



जळगाव | प्रतिनिधी : हमीद तडवी
दि. २६ जानेवारी २०२६ चोपडा पोलीस उपविभागाने जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागांना मागे टाकत ‘नंबर वन’ स्थान पटकावले असून, सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभाग म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था, जनतेशी थेट संवाद व तात्काळ कारवाई या सर्व आघाड्यांवर चोपडा उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात आपला दबदबा सिद्ध केला आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या खंबीर नेतृत्वाखाली चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, धरणगाव व अडावद पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांनी संघभावनेतून काम करत ही मोठी उपलब्धी मिळवली आहे.
विशेषतः अवैध धंद्यांवर कारवाई, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात आलेले उपक्रम व नागरिकांशी थेट संवाद साधणारी पोलीस यंत्रणा यामुळे चोपडा उपविभागाची कामगिरी जिल्ह्यात आदर्श ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप तसेच उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, चोपडा पोलीस उपविभागाचा हा सन्मान संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद मानला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध