Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

शिरपूर येथे श्री. खंडोबा यात्रोत्सव २०२६ उत्साहात; १ फेब्रुवारीपासून सुरुवात



शिरपूर (प्रतिनिधी) :
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या शिरपूर येथील सुमारे २७३ वर्षे प्राचीन श्री. खंडेराव महाराज मंदिरात श्री. खंडोबा यात्रोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात्रोत्सवाची सुरुवात माघ शुद्ध पौर्णिमा दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी होणार असून श्री. खंडेराव महाराजांची पालखी मिरवणूक १४ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी निघणार आहे.

या यात्रोत्सवाचे आयोजन श्री. खंडेराव बाबा विकास संस्था व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत असून संस्थेला हजारो भाविकांचा विश्वास लाभलेला आहे. भाविकांच्या देणगीतूनच मंदिराचा विकास, जीर्णोद्धार व आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

✨ मल्लार भक्तांचे मोलाचे योगदान

संस्थेच्या स्थापनेपासून मल्लार भक्तांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत व सहकार्य केले आहे. त्यांच्या देणगीतून मंदिराचा जीर्णोद्धार, पायाभूत सुविधा तसेच आवश्यक सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत. संस्थेने भाविकांचा विश्वास सार्थ ठरवत सर्व निधी योग्य कामांसाठी वापरला आहे.

🙏 मार्गदर्शन व प्रेरणा

खालच्यां गाव बालाजी मंदिराचे अध्यक्ष मा. भूपेशभाई पटेल यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून संस्थेचे कार्य सुरू आहे. तसेच आमदार अमरीशभाई पटेल व नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नातून श्री. खंडेराव बाबा देवस्थानाला ‘वर्ग तीर्थक्षेत्र’ाचा दर्जा मिळाला असून शासनाकडूनही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

🛕 मंदिर विकास कामे

देवस्थान परिसरात विद्युत रोषणाई, काँक्रीट रस्ते, कारंजे, बसण्यासाठी बाके, हिरवळ, पेव्हर ब्लॉक्स आदी विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत.

🤝 प्रशासनाचे सहकार्य

यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी शिरपूर पोलीस स्टेशन, डीवायएसपी, तहसीलदार, नगर परिषद, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, बाजार समिती यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांचे सहकार्य लाभत आहे. हजारो व्यापारी, भाविक व स्वयंसेवक यात्रोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.

📜 मंदिराची आख्यायिका

पूर्वी काळू बाबा नावाचे साधू येथे वास्तव्य करत असत. त्यांनी श्री. खंडेराव महाराजांची उपासना केली. नवसपूर्तीसाठी त्यांनी आपले शिरकमळ अर्पण केल्याची आख्यायिका असून, त्या ठिकाणी भंडाऱ्याचा चमत्कार घडल्याचे जुने लोक सांगतात. याच कारणामुळे शिरपूर हे नाव प्रचलित झाल्याचा उल्लेख आहे.

🕉️ परंपरागत पूजा-अर्चना

स्व. दौलत राम मोरे यांच्या वंशपरंपरेतून आजही मंदिरातील पूजा-अर्चना, अभिषेक व स्वच्छतेची कामे निष्ठेने केली जात आहेत. माधवराव मोरे, उत्तमराव मोरे, गोविंदराव मोरे व भानुदास मोरे हे पुजारी सेवा बजावत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध