Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ जानेवारी, २०२६
शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची दमदार कामगिरी
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर बस स्थानकात हातचलाखीने चोरी करणारा अवघ्या ४ तासांत जेरबंद ५०,००० रुपये रोख रक्कम हस्तगत शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत शिरपूर बस स्थानकात प्रवाशांच्या खिशातून हातचलाखीने पैसे चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या ४ तासांच्या आत जेरबंद केले असून त्याच्याकडून ५०,००० रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.
शिरपूर शहर पो.स्टे. गु.र.नं. ३६/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असून फिर्यादी किशोर फकीरा मोरे (वय ५१, व्यवसाय – शेती, रा. कुरखळी, ता. शिरपूर, जि. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,
दि. २८/०१/२०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता शिरपूर ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशातून ५०,००० रुपये चोरून नेले होते.
सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या माहितीवरून खंडेराव मंदिर परिसरात संशयित इसमास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव
राजु पोपट सैंदाणे (वय ६२, रा. वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे) असे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १०० नोटा, एकूण ५०,००० रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. सदर आरोपीकडून पुढील तपास सुरू असून तपास पोहेकॉ चेतन सोनवणे करीत आहेत. ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री.श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी तसेच डी.बी. पथकातील राजेंद्र रोकडे, चेतन सोनवणे, अनिल जाधव, रविंद्र आखडमल, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटू साळुंके, सोमा ठाकरे, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, आरीफ तडवी यांनी संयुक्तपणे पार पाडली
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बोराडी प्रतिनिधी : येथील ग्रामदैवताच्या दोन दिवसीय यात्रेला मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असला, तरी पहिल्याच दिवशी सुरक्षेच्या च...
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर बस स्थानकात हातचलाखीने चोरी करणारा अवघ्या ४ तासांत जेरबंद ५०,००० रुपये रोख रक्कम हस्तगत शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा