Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६

शिरपूरच्या नाकाला लागली ‘सन्टार’ची दुर्गंधी; तक्रारींचा कागद वाढतोय, पण प्रशासनाची बेशरम गप्पी सुरूच!



शिरपूर शहर व परिसरात मागील अनेक दिवसांपासून सन्टार कारखान्यातून येणाऱ्या प्रचंड दुर्गंधीने नागरिकांचे जगणे नरकयातनेत बदलले आहे. केमिकलयुक्त वासामुळे श्वास घ्यायलाही त्रास होत असताना, प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळी ही दुर्गंधी इतकी तीव्र होते की घरातील खिडक्या-दारे बंद करूनही वास घरात घुसतो. लहान मुले, वृद्ध आणि आजारी रुग्ण यांना मळमळ, उलट्या, डोकेदुखी, छातीत जडपणा व घशात जळजळ यांचा त्रास सुरू झाला आहे.

हा त्रास नाही, ही आरोग्यावरची थेट घातक झळ आहे! नागरिकांनी नगर परिषद, तहसील कार्यालय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या.

पण 👉 ना तपासणी 👉 ना कारवाई 👉 ना कारखान्यावर नोटीस
👉 ना दुर्गंधी थांबवण्याची कोणतीही उपाययोजना

मग प्रश्न असा की –

प्रशासन झोपले आहे की जाणीवपूर्वक झोपेचं सोंग घेत आहे?
की कारखान्याला मोकळीक देण्यामागे काही ‘अदृश्य हात’ काम करत आहेत?
एखादा छोटा व्यावसायिक नियम मोडला, तर तात्काळ सील, दंड आणि कारवाई होते.
मग मोठ्या कारखान्याला मात्र मोकळं रान का दिलं जातंय?
हा दुहेरी न्याय शिरपूरकरांना मान्य नाही!
सन्टार कारखान्यातील रसायनांची विल्हेवाट कशी लावली जाते?
फिल्टर सिस्टीम खरोखर कार्यरत आहे का?
प्रदूषणाचे मोजमाप कोणी केले?
हे सर्व प्रश्न अनुत्तरित आहेत. म्हणजेच,
शिरपूरकरांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू आहे!

विकासाच्या नावाखाली जर नागरिकांना विषारी हवेत श्वास घ्यायला लावायचा असेल, तर असा विकास थेट नाकारण्याची वेळ आली आहे. आज शिरपूरची ओळख औद्योगिक शहर म्हणून नव्हे, तर दुर्गंधीचे शहर म्हणून होऊ लागली आहे.
नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे –
जर तात्काळ कारखान्याची तपासणी करून दुर्गंधी कायमची थांबवली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.
प्रशासनाची कार्यालये घेराव घालण्यात येतील.

याला जबाबदार कोण?
➡️ थेट प्रशासन!

आज शिरपूरकरांचा संयम सुटत चालला आहे. दुर्गंधीचा श्वास घेऊन जगायचे?
की हक्काची स्वच्छ हवा मिळवण्यासाठी लढायचे? हा फक्त प्रश्न नाही…
हा इशारा आहे! ➡️ दुर्गंधी वाढतेय
➡️ लोक आजारी पडतायत ➡️ तक्रारी वाढतायत ➡️ पण प्रशासन मात्र अजूनही गप्प! आता जर प्रशासन हलले नाही, तर शिरपूरकर उठणार – आणि त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील!




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध