Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६
Home
/
/
साहेब रावल यांच्या हस्ते तापी घाटावर ऐतिहासिक महाआरती व स्व. डॉ. चि.अभिषेकदादा राजपूत सभागृहाचे लोकार्पण!
साहेब रावल यांच्या हस्ते तापी घाटावर ऐतिहासिक महाआरती व स्व. डॉ. चि.अभिषेकदादा राजपूत सभागृहाचे लोकार्पण!
सावळदे येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा; ३१ फुटी त्रिशूल स्थापना, लोकनेते सरकार
सावळदे (ता. शिरपूर, जि. धुळे) – श्री तीर्थक्षेत्र महादेव मंदिर, तापी घाट, सावळदे येथे दि. १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तीन दिवस तापी घाट परिसर भक्तिरस, उत्साह आणि जल्लोषाने भारावून जाणार असून पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यात्रेची सुरुवात दि. १३ फेब्रुवारी रोजी लोकनाट्य तमाशा सम्राट भीमा नामा अंजाळेकर यांच्या सादरीकरणाने होणार आहे. पारंपरिक लोककलेचा हा बहारदार कार्यक्रम यात्रेच्या पहिल्याच दिवशी वातावरण रंगतदार करणार असून ग्रामीण संस्कृतीची झलक अनुभवण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत हरिभक्तपरायण ह.भ.प. धनश्रीताई भडगावकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या प्रभावी वाणीमधून भाविकांना भक्तिरसाचा लाभ मिळणार आहे.
महाशिवरात्रीच्या मुख्य दिवशी दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत भव्य त्रिशूल शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषात आणि पारंपरिक वेशभूषेत ही शोभायात्रा गावातून मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते ११.३० या वेळेत ३१ फुटी भव्य त्रिशूल व कलश स्थापना विधिवत पार पडणार आहे. यावेळी शिवलिंग पूजन, कळस स्थापना तसेच महादेव मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याचे विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत.
याच दिवशी श्री वीर एकलव्य भगवान यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत हरिभक्तपरायण ह.भ.प. योगेश महाराज चिंचोलीकर यांचे कीर्तन होणार असून महाशिवरात्रीचा दिवस भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून तापी घाट सावळदे येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने लोकनेते सरकार साहेब रावल यांच्या शुभहस्ते महाआरती सुरू होणार असुन हा पायंडा ऐतिहासिक ठरणार आहे. तर महाशिवरात्री पासुन तापी मातेच्या भव्य महाआरतीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. खान्देशात प्रथमच तापी मातेची विशाल आरती होणार असून मातेचा साडी-चोळी व नारळ अर्पण करून सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे तापी घाट धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने नवीन ओळख निर्माण करणार असल्याचे बोलले जात आहे.
या यात्रेचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे केवलसिंग बन्सीलाल राजपूत यांच्या वतीने स्वर्गीय डॉ. चिरंजीव अभिषेक दादा राजपूत यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या भव्य सामाजिक सभागृहाचे नामकरण व लोकार्पण सोहळा. या प्रसंगी राजपूत परिवाराच्या दातृत्वाचा सन्मान समस्त सावळदे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान आकर्षक लेझर लाईट शो देखील सादर करण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान भाविकांसाठी तापी नदीकाठी नौकाविहार (बोटिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन स्टॉल, रक्तदान शिबिर आणि शासकीय वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे. तर भविष्यात विशाल खान्देशात तापी घाटाला भव्य असा सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक ओळख मिळवून देण्याचा मानस सावळदे येथील उपसरपंच तथा पॅनल प्रमुख गटनेते सचिन पदमसिंग राजपूत यांनी केला आहे. तर सावळदे गाव राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. तरी या भव्य धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास माता-भगिनी, युवक मंडळे तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त ग्रामस्थ सावळदे (ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा