Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६
माझे गणपूर! सुंदर दिसतं!
संस्कारी भासतं! वागण्यात!!
सुख दुःख येता!सदैव सोबती!
मदतीला येती! गावकरी!!
मध्यभागी दिसें! मंदिर मारोती!
सर्वांचिचं नीती! देवभोळी!!
प्रात पूजा होती! करतात शेती!
जपतात नाती! सारे जण!!
भवानी देवता! रक्षण करती!
काठा वरती! गावदेवी!!
नदीचा प्रवाह! वेगात असतो!
सर्वांना दिसतो! वाहतांना!!
गाव काठावर!अनेर वाहते!
वरून पाहते! गावदेवी!!
रक्षण करते! संकट समई!
सर्वांचीचं आई! माँ भवानी!!
प्रदीप सांगतो ! स्वप्नात आलीय!
सांगून गेलीय! मीच देवी!!
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

👍
उत्तर द्याहटवा