Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६
भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबीर दहिवद येथे आयोजित ! शेकडो शेतकर्यानी घेतला लाभ
अमळनेर प्रतिनीधी
शेतकरी मार्गदर्शन शिबीर दहिवद येथे आयोजित ! शेकडो शेतकर्यानी घेतला लाभ ,इजि.सौ.संगीता दिनेश पाटील संचालिका -किमेया अग्रो सॉल्यूशंस प्रा.लि.पुणे कार्यक्रमाचे आयोजक
महाराष्ट्र राज्याचे लाडके स्व.उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपुर्ण श्रद्धांजली देऊन कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली...
प्रमुख वक्ते कृषी वैज्ञानिक श्री. मिलींद पाटीदार संचालक, नेचर रूट्स बडवाणी, मध्य प्रदेश यांच मार्गदर्शन लाभले..
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषिभूषण श्री. सुरेश पिरन पाटील उपसभापती कृ. उ. बाजार समिती अंमळनेर हे होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. अनिल शिसोदे डांगरी ,श्री युवराज आप्पा माजी सरपंच सारबेटे,श्री प्रफुल्ल सीताराम पाटिल एकलहरे ,श्री. दिनेश पाटील मा. सदस्य भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली भारत सरकार,श्री.आर. एच. पवार कृषी सहाय्यक,श्री. निलेश पाटील कृषी सहाय्यक , श्री. प्रवीण माळी मा. उपसरपंच दहिवद,श्रीमती प्रतिभा सुभाष देसले पोलीस पाटिल यांची उपस्थिती लाभली.
वैज्ञानिक श्री. मिलींद पाटीदार यांनी टेकनॉलॉजि वापरून शेती कशी करायची, वेळेवर शेतीत खत, पाणी कसं द्यायचं, कश्या पद्धतीने जमिनीची तयारी करायची ह्या सर्व बाबतीत सखोल असं मार्गदर्शन केल व LED स्क्रीन च्या वापर करुण प्रात्यक्षिक दाखवलं ,पपई लागवड़ीपूर्वी जमीन मशागत,ख़त -पानी व्यवस्थापना वर मार्गदर्शन केलं..
श्री. दिनेश पाटील Ex .Member of ICAR ,(agricultural ministry) दहिवद चे भूमि पुत्र यांनी देखील 22 वर्षांपासून छत्तीसगढ़ राज्यातिल शेतकरी यांना आपल्या मार्गदर्शनाने शेतीची गुणवत्ता व उत्पादन वाढीसाठी कसे प्रयत्न केले ज्या मुलेच त्यांची निवड भारतीय कृषि अनुसंधान परिषदेवर झाली या विषयी सखोल अशी माहिती दिली. तसीच सेवा आपल्या परिसरातील शेतकरी बंधु साठी असा मानस व्यक्त केला,जेणेकरून आपल्या भागातील शेतकऱ्याचा पुढे जाऊन कसं उत्पादन वाढेल याच मार्गदर्शन केले, आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या कुठे -कुठे चुका होतात ह्या विषयी शास्त्रीय पद्धतीने संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केले. फवारा देताना कोनत्या PH ला कोनते कीटनाशक ,बुरशिनाशक चांगले रिजल्ट देते त्या विषयी सविस्तर माहिती दिली व कि मे या कंपनी मार्फत त्यांचे प्रतिनिधी शेता च्या बांधा वर जाऊ न शेतकऱ्यांना आलेल्या अडचणींना वेळोवेळी मार्गदर्शन करतील असा आश्वासन त्यांनी कार्यक्रमा प्रसंगी दिलं .शेतकऱ्यांचा उत्पादन ,गुणवत्ता व बाजार कसा वाढेल ? Ready to It and Ready to Cook प्रोडक्ट्स बनवून मूल्य वर्धन करुण अधिक फ़ायदा कसा घेता येईल हाच उद्देश आहे अस दिनेश पाटील यांनी सांगितले..
श्री.सुरेश पिरन पाटील यांनी आपल्या मनोगतात शेतकऱ्यांसाठी आजचा अतिशय उपयुक्त असा कार्यक्रम किमया ॲग्रो सोलुशन प्रा. लि. पुणे संचालिका इंजि.सौ संगीता दिनेश पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांना घडवून आणला , ज्याने शेती विषयी उपयुक्त मार्गदर्शन लाभले,हयाचा निच्छित च परिसरातील शेतकरी लाभ घेतील हयाची शाश्वती दिली,
गावातील परिवारातील पती चं निधन झाल्यानंतर कुटुंब सांभाळणाऱ्या 23 महिला भगिनींना उत्कृष्ट कृषी गौरव पुरस्कार देउन त्यांचा साड़ी,श्रीफल व सन्मान पत्रकाने गौरव करण्यात आला. त्यात
श्रीमती संगीताबाई भगवान माळी, श्रीमती प्रमिलाबाई साहेबराव माळी, श्रीमती आरुस्तोल राजेंद्र कोळी, श्रीमती जिजाबाई रमेश माळी ,श्रीमती अनिताबाई संजय माळी, श्रीमती प्रतिभा एकनाथ पाटील श्रीमती भटाबाई दिलीप पाटील ,श्रीमती पुष्पाबाई विकास पाटील, श्रीमती मीराबाई नारायण माळी, श्रीमती सुमित्रा पृथ्वीराज पाटील ,श्रीमती रुख्माबाई हिम्मत माली,श्रीमती मंगलबाई सुरेश भदाने ,श्रीमती रंजना शांताराम न्हावी,श्रीमती प्रतिभा गोकुळ माळी ,श्रीमती सुशीलाबाई आप्पा कोळी ,श्रीमती नंदा बाळासाहेब देसले ,श्रीमती लिलाबाई सैतान माळी ,श्रीमती अलकाबाई गोकुळ माळी ,श्रीमती मीराबाई विश्वास देसले ,श्रीमती छायाबाई भाऊसाहेब पवार ,श्रीमती मंगलबाई मनोहर माळी ,श्रीमती कासूबाई ताथू धनगर, व विशेष कृषि गौरव पुरस्कार …
पतीच अपंगत्त्व आल्यावर स्वतः कुटुंब सांभाळून स्वतः शेतीत काबळ कष्ट करणारी ,पाठीवर पंप घेऊन फ़वारा मारण, स्वतः बैलगाड़ी हाकन,रात्रि दिवसा शेतात पानी भरण हे काम करुण पतीला अपंगतेची कमतरता न भासू देनारी श्रीमति.सौ हिराबाई गोरख माळी यांना विशेष कृषी गौरव पुरस्कार देण्यात आला...
याप्रसंगी दहिवद,सोनखेडी, निमझरी, दहिवद खु, टाकरखेडा, म्हसले, कंडारी, लोणे, जुनोने, खेडी व्यवहारदळे, रामेश्वर बु, रामेश्वर खु, कुऱ्हे खु, कुऱ्हे बु, पलासडळे, देवगाव -देवळी.
ढेकु खु, ढेकु बु, सारबेटा खु,सारबेटा बु, हेडावे, सुंदरपट्टी, सडावन, कन्हेरे फ़ाफ़ोरे,रडावन-राजोरे, बिलखेडा,एकरूखी, बहादरवाडी, खोकरपाट.. ह्या गावाच्या प्रमुख शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जिजाबराव माळी व श्री सुभाष देसले यांनी केले आभार प्रदर्शन इंजिनियर सौ संगीता दिनेश पाटील संचालिका किमया ऍग्रो सोलुशन प्रा. लि. पुणे यांनी केले. यांनी
रेसिड्यू फ्री गुड पावडर,अद्रक पावडर, कांदा पावडर, मोरिंगा पावडर, शेवगा पाऊडर प्रकल्प लावण्याचा मानस व त्याची सुरुवात आपल्या परिसरात करण्यात येईल अस सांगीतले,त्यांचा फ़ायदा पारिसरातील शेतकर्याच्या मालाला होइल. किमया ऍग्रो सोल्युशन प्रा.लि.कंपनी हा माल पैकिजिंग करून ,विदेशात एक्सपोर्ट करेन ,हयाची एक्सपोर्ट लाइसेंसिंग प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती दिली .
ह्या कार्यक्रम प्रसंगी दाहीवद गावातील प्रमुख शेतकरी ,परिसरातील राजकीय व सामाजिक पदाधिकारी देखिल उपस्थित होते.हया प्रसंगी बाहेर गावाहून आलेल्या शेतकरी बांधवानी आमच्या गावात या व मार्गदर्शन करा सर्व व्यवस्था आम्ही करू असि विनंती केली । बहुमूल्य मार्गदर्शना बद्दल धन्यवाद देखील केल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा