Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ फेब्रुवारी, २०२६
खंडेराव महाराज यात्रेनिमित्त भाविकांसाठी पोलिसांचा सुरक्षा संदेश
शिरपूर शहरात होणाऱ्या खंडेराव महाराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस व शिरपूर शहर पोलिस दलाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी भाविकांनी काही आवश्यक खबरदारी घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महिलांनी यात्रेस येताना सोने-चांदीचे मौल्यवान दागिने घालून येऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्व भाविकांनी आपल्या जवळ मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगू नये, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने केवळ नेमून दिलेल्या पार्किंग ठिकाणीच लावावीत व वाहने नीट लॉक करून ठेवावीत, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यात्रेत लहान मुलांसोबत येणाऱ्या भाविकांनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांच्या खिशात पालकांचे नाव व मोबाईल क्रमांक लिहून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यात्रेला येण्यापूर्वी घर व्यवस्थित लॉक करूनच बाहेर पडावे व शक्य असल्यास घरात एखादी जबाबदार व्यक्ती ठेवून यात्रेचा आनंद घ्यावा, असेही सूचित करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिरपूर शहर पोलिस दलातर्फे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या असून, भाविकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित व शांततेत यात्रा पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा