Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६
रस्त्याच्या मधोमध वीज खांब! प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ
शिरपूर शहर परिसरात रस्त्याच्या अगदी मधोमध वीज वितरणाचा खांब उभा असून तो अपघातांना खुले आमंत्रण देत आहे. या धोकादायक खांबामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत असून, कोणत्याही क्षणी भीषण अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्याचे काम पूर्ण करूनही वीज खांब हलवण्यात आलेला नाही. हा खांब जणू प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा ठरत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खांब नीट न दिसल्याने दुचाकीस्वार व चारचाकी वाहनांना थेट धोका निर्माण होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी या मार्गावरून नियमित ये-जा करतात, त्यामुळे संभाव्य दुर्घटनेची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकाराकडे संबंधित यंत्रणांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. “अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्याच्या मध्यभागी वीज खांब ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ असून, हा प्रकार कोणत्याही निकषात बसणारा नाही.
सदर खांब तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित न केल्यास, भविष्यात घडणाऱ्या अपघातांची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन हा खांब हटवावा, अन्यथा नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा