Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६
Home
/
/
महर्षी वाल्मिकी ऋषींचा पूर्णाकृती पुतळा शिरपुरात उभारणार? आदिवासी कोळी समाजाचे पटेल पिता-पुत्रांना निवेदन
महर्षी वाल्मिकी ऋषींचा पूर्णाकृती पुतळा शिरपुरात उभारणार? आदिवासी कोळी समाजाचे पटेल पिता-पुत्रांना निवेदन
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि आदिवासी कोळी समाजाची अस्मिता असलेल्या महर्षी वाल्मिकी ऋषींचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिरपूर-वरवाडे नगर परिषदेचे गट नेते मा. श्री. भूपेशभाई पटेल व लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री. चिंतनभाई पटेल यांना आदिवासी कोळी समाजाच्या शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन दिले.
शहराच्या मध्यवर्ती भागात किंवा योग्य ठिकाणी महर्षी वाल्मिकी ऋषींचे स्मारक व्हावे, ही समाजाची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. या निवेदनाद्वारे समाजाच्या भावना मांडण्यात आल्या असून, पटेल साहेबांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
उपस्थित मान्यवर आणि लोकप्रतिनिधी
या ऐतिहासिक मागणीचे निवेदन देताना मोठ्या संख्येने नगरसेवक आणि समाज बांधव उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
नगरसेवक: वासुदेव दादा देवरे (दादाभाऊ), दीपकभाऊ माळी (पप्पूभाऊ), पिंटू भाऊ माळी, चंद्रकांत भाऊ सोनवणे, भालेराव भाऊ माळी, आशिष भाऊ पाटील (बारकू आबा), बाबुलाल भाऊ माळी, बाबा भाऊ गोसावी, पाटोळे दादा,आणि राज भाऊ भोई.
समाज प्रतिनिधी: मोहन भाऊ कोळी, गोलू भाऊ धोबी, विनायक कोळी, संदीप कुवर, संदीप माळी, किरण कोळी, सुभाष कोळी, मोहन मंडाले, नागेश कोळी, सोमनाथ धनगर, प्यारे मोहन, संदीप कोळी, सोनू कोळी, महेश कोळी, भाऊसाहेब कोळी, बापू वाघ, राधेश्याम चौधरी, मनोज कोळी, राहुल कोळी, दीपक कोळी, जितेंद्र कोळी, विजय कोळी, शामराव कोळी, राजू कोळी, रणजित कोळी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"महर्षी वाल्मिकी ऋषींचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या पुतळ्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वारशात नक्कीच भर पडेल," अशी भावना यावेळी उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केली.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा