Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६
Home
/
/
गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई; १.५४ कोटींचा मुद्देमाल जप्त
गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई; १.५४ कोटींचा मुद्देमाल जप्त
नाशिक प्रतिनिधी:- नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्र.१, नाशिक यांनी गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे १ कोटी ५४ लाख ९० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई मा. डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य), मा. श्री. प्रसाद सुर्वे (सह आयुक्त – अंमलबजावणी व दक्षता), मा. श्रीमती उषा वर्मा (विभागीय उप-आयुक्त, नाशिक विभाग), मा. श्री. संतोष झगडे (अधीक्षक, नाशिक) व मा. श्री. अ.सु. तांबारे (उपअधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुप्त बातमीच्या आधारे दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सिन्नर–नाशिक रोडवर शिंदे पळसे टोलनाक्याच्या पाठीमागे, इंडियन ऑईल पेट्रोलपंपासमोर वाहन तपासणी सापळा रचण्यात आला. दरम्यान संशयित आयशर कंपनीचा सहाचाकी ट्रक (क्र. KA-52-C-3687) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची रॉयल ब्लू व्हिस्की १८० मि.ली.च्या एकूण ६५,७६० सिलबंद बाटल्या (१३७० बॉक्स) आढळून आल्या.
या प्रकरणी वाहनचालक कंवरा राम हरभज राम (वय २८, रा. लसिया, ता. धनाऊ, जि. बाडमेर, राजस्थान) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत गोवा बनावटीचा मद्यसाठा, आयशर ट्रक व एक मोबाईल असा एकूण १.५४ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक संजय सावंत, गणेश नागरगोजे, पी. वाय. गायकवाड तसेच जवान दीपक आव्हाड, संदीप देशमुख, व्ही. ए. चव्हाण, सागर पवार, अमित गांगुर्डे, अमन तडवी, महिला जवान अनिता भांड, निरीक्षक शैलेंद्र मराठे व मालेगाव-३ येथील दुय्यम निरीक्षक रियाज शेख यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय भिवा सावंत (भरारी पथक क्र. १, नाशिक) हे करीत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
धुळे प्रतिनिधी :- धुळे शहरातील देवपूर भागातील वाकसकर चेंबर, दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या 'श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड'च्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा