Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६
Home
/
Unlabelled
/
नवीन बांधकामातून इलेक्ट्रिक वायरची चोरी करणाऱ्या टोळीला शिरपूर पोलिसांचा दणका; ३ आरोपी अटकेत, १.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नवीन बांधकामातून इलेक्ट्रिक वायरची चोरी करणाऱ्या टोळीला शिरपूर पोलिसांचा दणका; ३ आरोपी अटकेत, १.०५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकाने मोठी कारवाई करत नव्याने सुरू असलेल्या घरबांधकामातून इलेक्ट्रिक वायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १ लाख ०५ हजार ०८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. ४८/२०२६, भादंवि कलम ३७९, ४५४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गुलाबसिंग गिरसे (वय ३८, व्यवसाय नोकरी, रा. जांबोडा, ता. शिरपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ ते ८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान शिरपूर शहरातील वडसडी रोडवरील पाणी फिल्टर प्लांटजवळ सुरू असलेल्या नवीन घरबांधकामातून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून RR केबल कंपनीची १७ बंडल इलेक्ट्रिक वायर (हिरवी, पिवळी, काळी, लाल व निळ्या रंगाची) चोरून नेली होती.
या गुन्ह्याचा तपास डी.बी. पथकाचे पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना, गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अष्टगावती नदी पुलाजवळ काही संशयित इसम काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीवर संशयास्पद साहित्य विक्रीसाठी घेऊन फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
तपासात आरोपींची नावे
१) रोहित दगड कोळी (वय १९, रा. जांबोडा, ता. शिरपूर)
२) बबलू उर्फ आदित्य जामसिंग पावरा (वय १९, रा. पारसवाडी, वडसडी, ता. शिरपूर)
अशी निष्पन्न झाली. त्यांच्याकडून चौकशीत चोरी केलेली इलेक्ट्रिक वायर पाणी फिल्टर प्लांट येथून संघटितरीत्या चोरल्याची कबुली देण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून
➡️ ५५,०८४ रुपयांची इलेक्ट्रिक वायर
➡️ ५०,००० रुपयांची हिरो स्प्लेंडर दुचाकी
असा एकूण १,०५,०८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींना अटक करून दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ/रविंद्र आव्हाड करीत आहेत.
ही कारवाई
मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे,
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील गोसावी
यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,
डी.बी. पथकातील पोहेकॉ रविंद्र आव्हाड, विनोद आव्हाड, गोविंद कोळी, प्रशांत पवार, मनोज महाजन, योगेश दामोडे, सचिन वाघ, आरिफ तडवी, सोमा ठाकरे
यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा