Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

भ्रष्टाचाराचा पर्दाफाश: नंदुरबार PWD उप अभियंता ८ लाखांची लाच घेताना अडकला



नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) उप अभियंता ८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला आहे. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित उप अभियंत्याने कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ८ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीने सापळा रचून आज ही कारवाई केली.लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने उप अभियंत्याला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.
👉 पुढील तपास एसीबी धुळे विभागाकडून सुरू आहे.
👉 आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल होणार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध