Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
यावलमध्ये बाल संरक्षणासाठी सीपी फोकल पर्सन प्रशिक्षण यशस्वी; शहीद दिनी क्रांतिकारकांना अभिवादन
यावलमध्ये बाल संरक्षणासाठी सीपी फोकल पर्सन प्रशिक्षण यशस्वी; शहीद दिनी क्रांतिकारकांना अभिवादन
यावल प्रतिनिधी:- दिनांक 23 मार्च 2026 रोजी यावल प्रकल्प कार्यक्षेत्रात बाल मैत्री पूर्ण आश्रम शाळा कार्यक्रम अंतर्गत सी.पी.फोकल पर्सन प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. तसेच 23 मार्च हा शहीद दिवस असल्याने यावेळी क्रांति सेनानी शहीद भगत सिंह, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरु यांच्या बलिदानाला उजळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास यावल प्रकल्प कार्यालयातर्फे शिक्षण विस्तार अधिकारी श्री.आर जे मुसळे साहेब आणि श्री. व्हि डी गायकवाड साहेब यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मुख्याध्यापक श्री. ए एस मंगळे सर यांनी भूषवले सोबतच कार्यक्रमाला मुख्य प्रशिक्षक म्हणून श्री प्रवीण भाऊ खांडपासोळे सर येही उपस्थित होते त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले महिला मंडळ कार्यक्रम प्रमुख डॉ. श्री.नरेंद्र पवार सर उपस्थित होते.
सीपीफोकल पर्सन प्रशिक्षण हे मा.प्रकल्प अधिकारी साहेब श्री. अरुणजी पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिण्यात आलेले होते. प्रशिक्षणाचे आयोजन शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडे आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले.
प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातला अनुभव आणि प्रदीर्घ अभ्यास यामुळेप्रशिक्षक श्री.प्रवीणभाऊ खांडपासोळे सर यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण घेतले त्यांच्या या गोष्टीमुळे सर्वच सीपी फोकल पर्सन हे पूर्णवेळ प्रशिक्षणाला मनापासून उपस्थित असल्याचे चित्र होते.
प्रशिक्षणा दरम्यान वातावरण निर्मिती म्हणून एएसएम अरविंद खडसे आणि मनिषा बैसाणे यांनी गाणे व ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून सी पी फोकल पर्सन यांच्यात उत्साह निर्माण केला.
प्रशिक्षणाच्या शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी श्री व्ही डी गायकवाड सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री ए एस मंगळे सर यांनी प्रशिक्षणामध्ये सी पी फोकल पर्सन भूमिका आणि जबाबदारी,जे जे ऍक्ट आणि पोक्सो अॅक्ट याबाबत मत मांडताना सांगितले की बाल संरक्षणामध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अतिशय साध्या सोप्या आणि प्रत्यक्ष घडलेल्या उदाहरणा देऊन समजून सांगितल्याने ती सर्वांच्या लक्षात राहिल. तसेच संस्थेच्या एएसएम यांचे कार्यक्षेत्रातील कामाबद्दल हे समाधान व्यक्त केले.मुख्याध्यापक श्री आर एस तायडे सर,शिक्षक श्री.मनोज पिंगळे,शिक्षक श्री.बी. एच. नांदुरे आणि स्त्री अधीक्षका श्रीमती टी. के. खुणे मॅडम यांनी देखील प्रशिक्षणाबाबत सकारात्मक मत नोंदवून अशा प्रकारचे प्रशिक्षण शाळा स्तरावर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी झाले तर बाल संरक्षणाचे कार्य यशस्वीरित्या होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करत शाळा स्तरावर सुरू असलेला बाल मैत्री पूर्ण आश्रम शाळा कार्यक्रम शाळा वगैरे यांचे कार्य उत्कृष्ट असून सावित्रीबाई फुले महिला मंडळ च्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्थांचे एएसएम श्रीमती मनीषा बैसाणे मॅडम, श्री अरविंद खडसे, श्री दिनेश कुमार पाटील, श्री जयेश वाडीले आणि श्री जितेंद्र कामाडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. सोबतच शासकीय आश्रम शाळा पिंगळवाडे येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील अनमोल सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. जितेंद्र गुरव सर यांनी केले तर प्रस्तावना आणि आभार प्रकल्प समन्वयक श्री विक्रम शिंदे यांनी मानले.
यावेळी सावित्रीबाई फुले महिला मंडळ जबाबदारीतील 17शासकीय आश्रम शाळांचे प्रमुख पाहुणे, सीपी फोकल व एस एम आणि प्रमुख पाहुणे मिळून एकूण 45 व्यक्ती उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा