Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२६
रस्त्यासाठी ११ महिने पाठपुरावा निष्फळ; वृद्ध दाम्पत्याचे तहसीलसमोर आमरण उपोषण
शिरपूर (प्रतिनिधी) – शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी तब्बल ११ महिन्यांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवणाऱ्या वृद्ध दाम्पत्याने अखेर टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी (ता. २४) तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे उपोषणकर्ते दत्तात्रय व्ही.बेडसे व मंगला दत्तात्रय बेडसे यांनी
सांगितले वृद्ध दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी सध्या कोणताही योग्य रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीसह दैनंदिन कामांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. शेतातील गोठ्यात कापूस साठवून ठेवण्यात आला असला, तरी व्यापाऱ्यांची वाहने शेतापर्यंत पोहोचू शकत नसल्याने माल विक्री रखडली आहे. परिणामी, त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
याशिवाय, शेताकडे जाण्याचा प्रयत्न केल्यास गट क्रमांक ६०, ६१ व ६२ मधील काही शेतकऱ्यांकडून दमदाटी केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. रस्ता नसल्यामुळे नांगरणी, पेरणी, खत टाकणे यांसारखी शेतीतील महत्त्वाची कामे वेळेत होत नसल्याने उदरनिर्वाहावर थेट परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या संदर्भात तहसीलदारांकडे अनेक वेळा लेखी तक्रारी देऊनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तहसील कार्यालयासमोर सुरू झालेल्या या उपोषणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गट क्रमांक ५९/१, ५९/२ व ५९/३ या शेतजमिनींची मोजणी करून त्यांच्या शेतासाठी अधिकृत रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांकडूनही या प्रकरणात तात्काळ तोडगा काढण्याची मागणी होत असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा