Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ मार्च, २०२६
शिरपूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई; 4.66 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धडाकेबाज कारवाई करत सुमारे 4 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमावर्ती भागात गस्त घालत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, एका चारचाकी वाहनातून अवैध मद्य वाहतूक केली जात आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून वाहन क्रमांक MP09 ZL 3424 संशयितरित्या थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहनचालकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. यात सुमारे 250 लिटर देशी मद्य (टिनमध्ये) तसेच इतर मद्यसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईत वाहनासह एकूण ₹4,66,000/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी शिरपूर तालुक्यातील संबंधित ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ), (ड) व 108 अन्वये पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई देवदत्त नेहळे, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, शिरपूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात के. एम. निगोटे, संतोष चौधरी, वाहनचालक श्री. रवींद्र साळुंखे यांचा समावेश होता.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा WhatsApp क्रमांक 8422001133 तसेच दूरध्वनी क्रमांक 02562-297484 वर संपर्क साधावा.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा