Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
‘सत्तेची साथ, विकासाची वाट ?’ परंडा तालुक्यातील समीकरणे बदलली; खरसडे सभापतीपदी..
‘सत्तेची साथ, विकासाची वाट ?’ परंडा तालुक्यातील समीकरणे बदलली; खरसडे सभापतीपदी..
परंडा, दि. २७ : धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ताकारणात परंडा तालुक्याचा प्रभाव वाढल्याचे चित्र समोर आले असून, जि. प. डोंजा गणाचे सदस्य भाऊसाहेब बाबासाहेब खरसडे यांची कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी निवड ही त्याचाच भाग मानली जात आहे.
खरसडे हे बाणगांगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक असून, सहकार आणि स्थानिक राजकारणातील त्यांचा सक्रिय सहभाग लक्षवेधी राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी आमदार राहुल मोटे यांचे ते निकटवर्तीय व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. ग्रामीण भागात पक्ष संघटना मजबूत करण्यामध्ये त्यांनी योगदान दिल्याचे मानले जाते.
या निवडीमुळे परंडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला बळ मिळाल्याची चर्चा असली, तरी आता खरी कसोटी त्यांच्या कामगिरीची राहणार आहे. विशेषतः कृषी व पशुसंवर्धन विभागातील प्रलंबित प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि जनावरांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर ठोस निर्णय अपेक्षित आहेत.
लक्षवेधक बाब : ‘पाचही सदस्य सत्ताधारी:-
परंडा तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद सदस्य हे सध्या जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षांशी संबंधित असल्याने तालुक्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे. यामुळे निधी, योजना आणि विकासकामांमध्ये तालुक्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, या ‘सत्तेच्या ताकदी’चा उपयोग प्रत्यक्ष विकासासाठी कितपत होतो, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. आता खरी स्पर्धा ही कोणता सदस्य आपल्या भागासाठी जास्तीत जास्त विकासकामे खेचून आणतो, याचीच राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
📌 जिल्हा परिषदेत सत्तेची मांडणी :-
🔹 अध्यक्ष – अर्चनाताई पाटील (भाजप)
🔹उपाध्यक्ष – उषाताई गायकवाड (शिवसेना – शिंदे गट)
📌 सभापती पदांची विभागणी :-
समाजकल्याण सभापती – विश्वास हनुमंत कोकणे (भाजप)
महिला व बालकल्याण सभापती- पूजा तुषार शिंदे(शिवसेना)
अर्थ व बांधकाम सभापती –सिद्धेश्वर बळीराम कोरे(भाजप)
कृषी व पशुसंवर्धन सभापती – भाऊसाहेब बाबासाहेब खरसडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा