Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ मार्च, २०२६

पुणेगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद




महाराष्ट्र शासनाचे दि.१८/०२/२०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ ची अंमलबजावणीची सुरवात दिंडोरी तालुक्यात माहे मार्च पासून सुरु झालेली आहे.
सदर अभियानाचे अनुषंगाने मा.मंत्री महोदय आदरणीय नरहरी झिरवाळ ( अन्न व औषध प्रशासन ) गोकुळभाऊ झिरवाळ यांचे संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराची माहिती प्रसिद्धी व शासकीय योजनांची माहिती सर्व ग्रामस्थांना पोहोचावी या उद्देशाने व्हॅनचे अनावरण करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे , तहसीलदार मुकेश कांबळे यांचे आदेशानुसार कसबे वणी मंडळातील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराची पूर्वतयारी म्हणून मौजे पुणेगाव येथे आज पूर्वतयारी म्हणून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात विविध दाखले प्राप्त करून घेण्यासाठी ग्रामस्थांकडून सेतूमार्फत परिपूर्ण फोर्म जमा करून घेण्यात आले. सदर पूर्वतयारी शिबिरात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व उत्तम प्रतिसाद यावेळी मिळाला. सदर शिबिरावेली मंडळ अधिकारी स्वप्निल थोरात, ग्राम महसूल अधिकारी राहुल भोये व कसबे वणी मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी,, कोतवाल उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध