Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ मार्च, २०२६
दिंडोरी येथे क्रीशा फाउंडेशन संचलित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.
बापू चव्हाण दिंडोरी
क्रिशा फाऊंडेशन संचलित ज्ञानज्योती क्लासेस,किड्स टाऊन स्कूल आणि क्रिशा टेक्नो हबचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड,उपसभापती योगेश बर्डे,मविप्रचे संचालक प्रवीण जाधव,नितीन जाधव,भाजपाचे तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे, तालुका सरचिटणीस दिगंबर ढाकणे,अमोल खोडे,राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे, शहराध्यक्ष नरेश देशमुख, नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष मेघाताई धिंदळे,उपनगराध्यक्ष शैलाताई उफाडे लताताई बोरस्ते आशाताई कराटे आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रिशा टेक्नो हबचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी क्रिशा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उज्वला कोथळे यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करून आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी या संमेलनात मोठ्या संख्येने भाग घेऊन वेगवेगळ्या गीतांवर नृत्य करून रसिकांची दाद मिळवली विद्यार्थ्यांनी मंगळागौरीच्या संगीत ठेक्यावर चिमुकल्यांनी ठेका धरत उत्तम सादरीकरण केले याशिवाय मराठमोळी गीतांवर नृत्य करण्यात आले यामध्ये बाई मी केळीवाली पासून आमचीच हवा पर्यंत गीतांचे सादरीकरण करून नृत्य केले. त्यामुळे या संगीतमय मैफिलीला रसिकांनी भरभरून दाद दिली.याशिवाय " तु ये ग ये बाई, गाऊ आकाशाची अ आ इ " सारख्या महिलांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या गीतांनी महिला वर्गाकडून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळाला.उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शाळेच्या तसेच क्लासच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन जगदीश साळुंखे,क्रिशा कोथळे,प्रियदर्शनी दळवी यांनी केले.तर आभार क्रिशा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उज्वला कोथळे यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा