Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मार्च, २०२६

वणी पोलीसांकडून अ.मृ बी.एन.एस.एस १९४ मधील मयताचा व वारसदाराचा शोध सुरु ओळखीचे असल्यास वणी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान


                      अनोळखी मृतदेह 

माधव खाबिया :-

पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण
यांचे कडे दाखल असलेल्या अ.मृ र.नं. २७/२०२६ बी.एन.एस.एस १९४ मधील मयताचा व वारसदाराचा शोध सुरु असून या बाबत वणी पोलीस ठाण्यात वैभव कैलास देशमुख वय २८ वर्ष रा. करंजवण, ता. दिंडोरी, जि. नाशिक यांनी आकास्मित मृताची खबर दिली असून मयताचे नाव अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे ४०
ते ४१ वर्षे, नाव गाव माहित नाही असे सांगिलते असता
अ.मू.घ.ता.वेळ दिनांक २३/०३/२०२६ रोजी १५:३०
वाजेचे पुर्वी वेळ नक्की माहित नसून अ.मृ.ठिकाण वणी ग्रामीण रुग्णालय कसबे वणी ता दिंडोरी जि नाशिक या ठिकाणी आणले असता अ.मू.दा.ता.वेळ दि.२३/०३/२०२६ रोजी १७:१४ वा. दाखल केले असता वैद्यकीय तपासणी दरम्यान मृत घोषित केले यातील प्रकार असा कि बेवारस मयत वय अंदाजे ४० ते ४१ वर्ष हा बेशुध्द अवस्थेत लखमापुर फाटा शिवार ते नाशिक रोडचे कादवा नदीचे पुलाचे अलीकडे, ता. दिंडोरी, जि. नाशिक हा बेशुध्द आढळून आल्याने, त्यास वणी ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मयत घोषित केले आहे.मयताचे वर्णन खालील प्रमाणे :- एक अंदाजे ४० ते ४१ वर्ष वयाचे पुरूष जातीचे प्रेत केस काळे, डोळे पिवळे पडलेले, दाढी वाढलेली, डाव्या हाताच्या कांभीवर गरुड पक्षीचे गोंदलेले, मराठीत सावन व निलम गोंदलेले तसेच उजव्या हातावर इंग्रजीत ( P ) निलम व सावन मराठी, कमरेवर पोटावर उन्हामुळे काळाचट्टा पडलेला. अंगात मळकट चॉकलेटी रंगाचा त्यावर काळे टिपके असलेला फुल शर्ट हाताच्या बाहया दंडापर्यंत वाळविलेल्या व कंमरेस लाल रंगाचा करदोडा, निळया रंगाची फुल मळकट जिन्स पॅन्ट, छातीवर डावे बाजुस इंग्रजीत एस. के. नाव गोदलेले असुन नमुद वर्णनाचे मयताचा व 
मयताचे वारसदाराचा वणी पोलीस ठाणे हददीत ताबे पोलीसां तपास होवून परिणामी वरिष्ठ प्रभारी यांना रिपोर्ट सादर करण्यात आला असून कोणालाही या बाबत काही माहिती आढळ्यास तसेच ओळखीचे वाटल्यास वणी पोलीस स्टेशन च्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनखाली पो. उप निरीक्षक किरण विठ्ठल जगदाळे ८८८८१९५००७
संपर्क नंबर ०२५५७-२२०१३३
यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध