Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ मार्च, २०२६
Home
/
/
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुत्राशयाला दोरी बांधली,त-हाडी आश्रमशाळेतील अमानवीय प्रकार; बिरसा फायटर्सची कारवाईची मागणी!
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुत्राशयाला दोरी बांधली,त-हाडी आश्रमशाळेतील अमानवीय प्रकार; बिरसा फायटर्सची कारवाईची मागणी!
शहादा प्रतिनिधी : शासकीय आदिवासी आश्रम शाळा, त-हाडी तालुका शहादा येथील विद्यार्थी प्रतीक निमा वळवी इयत्ता ४ थी याच्यावर मुत्राशयाला दोरी बांधून झालेल्या अमानवीय वागणूक व शिक्षकांच्या निष्काळजीपणाबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,आदिवासी आश्रम शाळा, त-हाडी, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील इयत्ता ४ थीत शिकणारा विद्यार्थी प्रतीक निमा वळवी याच्या मुत्राशयाला दोरी बांधून अत्यंत गंभीर व अमानवी प्रकार घडलेला आहे.दिनांक ०६/०२/२०२५ रोजी सदर विद्यार्थ्याच्या मुत्राशय म्हणजेच प्रायव्हेट भागाला दोरी बांधण्यात आली. हा प्रकार अत्यंत धोकादायक असूनही शाळेतील शिक्षकांनी या गंभीर प्रकाराकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी ही बाब उघडकीस आली, म्हणजे तीन दिवस विद्यार्थ्याला कोणतीही मदत मिळाली नाही किंवा औषधोपचार करण्यात आले नाहीत.या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम धुळे येथील रुग्णालयात दाखल करून ऑपरेशन करण्यात आले, परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात पुन्हा ऑपरेशन करण्यात आले.तरी देखील संबंधित शाळेतील शिक्षकांनी या घटनेबाबत कोणतीही जबाबदारी घेतली नाही. उलट, विचारणा केल्यावर “एलसी घेऊन जा” शाळा सोडल्याचा दाखला देऊन जा,असे सांगून पालकांना व विद्यार्थ्याला मानसिक त्रास देण्यात येत आहे.
ही घटना अत्यंत गंभीर असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण करते. त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की:१) या संपूर्ण घटनेची तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी.२) संबंधित दोषी शिक्षकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.३) पीडित विद्यार्थ्याला योग्य ती वैद्यकीय मदत व आर्थिक सहाय्य करण्यात यावे.४) भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेत कडक उपाययोजना कराव्यात.तरी आपण या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून विद्यार्थी व पालकास न्याय द्यावा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चिमठाणे प्रतिनिधी – प्रविण भोई धुळे–नंदुरबार महामार्गावरील चिमठाणे गाव शिवारातील दराणे फाट्याजवळ, पेट्रोलपंपाशेजारी सोमवारी सकाळी सुमारे ८ व...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा