Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ५ मार्च, २०२६
चिंचखेडला आज कालभैरवनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे श्री कालभैरवनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा व कलशरोपण सोहळा गुरुवार दि.५ मार्च पासून १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत होणार आहे.
गुरुवार ५ मार्च रोजी ८ ते १२ वाजेपर्यंत भव्य मिरवणूक तसेच नवकुंडात्मक यज्ञ व पूजा विधी आणि शिव महापुराण कथा प्रारंभ होणार असून शुक्रवार ६ आणि शनिवार ७ मार्च रोजी नवकुंडात्मक यज्ञ व पूजा विधि तसेच सायंकाळी ७ ते ९ शिव महापुराण कथा आणि रविवार ८ मार्च रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण महाप्रसाद आणि शिवमहापुराण कथा सांगता होईल,कार्यक्रमादरम्यान रोज सायंकाळी महाप्रसाद राहील अशी माहिती श्री भैरवनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष रवीनंदजी महाराज यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला गोकुळ झिरवाळ,राजेंद्र उफाडे,गणपत बाबा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रवीनंदजी महाराज आणि कालभैरवनाथ मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. मिरवणुकीसाठी विशेष आकर्षण म्हणून नामांकित ब्रास बँड देखील असणार आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा