Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १२ मार्च, २०२६
Home
/
Unlabelled
/
नाशिक विभागात बॅकडेटेड मान्यतांचा घोटाळा ? सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांच्या डुप्लिकेट सह्यांवर फाईल मंजूर केल्याचा गंभीर आरोप
नाशिक विभागात बॅकडेटेड मान्यतांचा घोटाळा ? सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांच्या डुप्लिकेट सह्यांवर फाईल मंजूर केल्याचा गंभीर आरोप
दोन शिक्षणाधिकाऱ्यांनी नाकारलेल्या फाईल्स नंतर मंजूर; कोर्टालाही खोटी माहिती सादर केल्याचा संशय, चौकशीची मागणी
नाशिक प्रतिनिधी:- नाशिक विभागातील काही शाळांमध्ये बॅकडेटेड मान्यता काढण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर येत असून, सेवानिवृत्त झालेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या डुप्लिकेट सह्या करून फाईल पूर्ण करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप पुढे आला आहे. या प्रकरणात न्यायालयासमोरही चुकीची व दिशाभूल करणारी माहिती सादर करून संबंधित संस्थांनी निकाल आपल्या सोयीनुसार मिळविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शाळांच्या मान्यता फाईल्सना एक नव्हे तर दोन शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार देत त्या संस्थेकडे परत पाठविल्या होत्या. म्हणजे त्या शाळांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली नव्हती. मात्र त्यानंतर त्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदली झाल्यानंतर आलेल्या नव्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात या फाईल्स पुन्हा काढण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रक्रियेदरम्यान सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्यांच्या मागील नोट्समध्ये फेरफार करून त्यांच्या नावाने डुप्लिकेट सह्या करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयाची तारीख आणि संबंधित कर्मचाऱ्याला देण्यात आलेली मान्यता यामध्ये मोठा कालावधी असल्याचेही निदर्शनास येत आहे.
या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहार किंवा संगनमत झाल्याशिवाय अशा प्रकारे फाईल पुढे सरकणे शक्य नसल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या मान्यता प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
याबाबत शासनाने नाशिक विभागासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशा प्रकारच्या मान्यता फाईल्सची तपासणी करून त्यातील नोट्स, न्यायालयीन आदेश व कागदपत्रांची सत्यता पडताळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक तसेच शासनातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा