Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मार्च, २०२६

ढकांबे येथे सशस्त्र दरोड्यानंतर जखमी कुटुंबाला गावकऱ्यांची तीन लाखांची मदत





बापू चव्हाण दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावात २३ मार्च रोजी झालेल्या सशस्त्र दरोड्यात जखमी झालेल्या धात्रक कुटुंबाला गावकऱ्यांनी एकजुटीने मदतीचा हात पुढे केला आहे.गावातून वर्गणी जमवून सुमारे तीन लाख रुपयांची आर्थिक मदत कुटुंबाला देण्यात आली.
या दरोड्यात मनोहर धात्रक, ताराबाई धात्रक आणि सुरेश धात्रक हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमींपैकी काहींना मेंदूवरील शस्त्रक्रियेची गरज असल्याने पुढील उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

धात्रक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने गावकऱ्यांनी सढळ हाताने मदत करत मानवतेचे दर्शन घडवले.या मदतीमुळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान,उपचारांचा खर्च मोठा असल्याने अजूनही आर्थिक मदतीची गरज असून इतर नागरिकांनीही पुढे येऊन सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी पोलीस पाटील, सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ज्येष्ठ नागरिक,युवक आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध