Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ एप्रिल, २०२६
Home
/
/
पालखेड कॉलनी परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत वासरी खाल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये घबराट.
पालखेड कॉलनी परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत वासरी खाल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये घबराट.
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :-
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी चंदू सोनवणे यांच्या राहत्या घराजवळ बांधलेल्या वासरीवर बिबट्याने हल्ला करून तिला मारून टाकले त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण झाले असून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केले आहे.
या आधीही या परिसरात बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या गाई, बकऱ्या,पाळीव कुत्रे कोंबड्या तसेच मेंढपाळांच्या मेंढ्या फस्त केलेले घटना घडल्या आहे.त्यामुळे अनेक वेळा या परिसरात पिंजरा लावून देखील बिबट्या येत नव्हता परंतु काही महिन्यानंतर उशिरा का होईना या कॉलनी परिसरात दोन बिबटे पकडण्यास वनखात्याला यश आले होते.त्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये थोड्या प्रमाणात का होईना भीती कमी झाली होती.मात्र आज झालेल्या या वासरीच्या हल्ल्यामुळे या कॉलनी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या गरीब शेतकऱ्याने शेतीला जोड धंदा म्हणून गांईचे पालन केले होते दोन पैसे दुध व्यवसायातून मिळतील या आशेने व्यवसाय सुरू करायचा होता परंतु हा डाव अर्ध्यावरच मोडल्याने शेतकऱ्यांनी काय करायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू (तात्या) चव्हाण यांनी यावेळी संबंधित विभागाशी संपर्क केला असता वन विभागाचे वनपाल योगेश दळवी व खुशाल गांगुर्डे यांनी घटनास्थळी येऊन या वासरीचा त्वरित पंचनामा केला. त्यानंतर बापू (तात्या) चव्हाण यांनी व शेतकरी नागरिकांनी या परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.याप्रसंगी चंद्रकांत सोनवणे,पिंटू सोनवणे, सुप्रिया जाधव,धनराज महाले,संदीप पीठे,प्रशांत देशमुख,आदी उपस्थित होते.
चौकट
काही महिन्यांपूर्वी या कॉलनी परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होता मात्र वन विभागाच्यावतीने वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरा लावून या परिसरात दोन बिबटे पकडले होते.मात्र आजच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे त्या परिसरात पुन्हा पिंजरा लावावा.
बापू (तात्या) चव्हाण सामाजिक कार्यकर्ते पालखेड बंधारा
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
बापू चव्हाण नाशिक दिंडोरी तालुक्यात आज गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वारा व विजांच्या क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा