Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १६ एप्रिल, २०२६
पालखेड येथील शेतकऱ्यांकडून कृषी अधिकारी सुनील हिरे यांचा सत्कार.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील शेतकरी अरुण सोळसे व रवी सोळसे गायक प्रतीक सोळशे यांनी नुकताच कृषी अधिकारी सुनील हिरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन २०२४-२५ अंतर्गत नवीन सिंचन विहीर व विद्युत पंप संच या घटकांचा लाभ अनुदान रक्कम ४.४० लाख रुपये पालखेड बंधारा येथील अरुण सोळसे या गरजू शेतकऱ्याला दिंडोरी पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले कृषी अधिकारी सुनील हिरे यांनी विशेष घटक योजनेच्या माध्यमातून लाभ दिला. यावेळी बापू (तात्या) चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की येणाऱ्या काळामध्ये ही तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावालाभ द्यावा कसे आवाहन करून कृषी अधिकारी सुनील हिरे यांचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी शेतकरी अरुण सोळसे यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेपोटी हिरे यांच्या याच कार्याची दखल घेऊन दिंडोरीचे गटविकास अधिकारी तथा मार्गदर्शक भास्कर रेंगडे यांच्या उपस्थिती कृषी अधिकारी सुनील हिरे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू (तात्या) चव्हाण यांनी केले.तर आभार अरुण सोळशे यांनी मानले यावेळी शेतकरी उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा