Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ एप्रिल, २०२६
Home
/
/
अक्राळे फाटा ते ओझर रस्त्याबाबत निवेदन अक्राळे फाटा ते ओझर रस्त्याबाबत निवेदन अक्राळे फाटा ते ओझर रस्त्याबाबत निवेदन
अक्राळे फाटा ते ओझर रस्त्याबाबत निवेदन अक्राळे फाटा ते ओझर रस्त्याबाबत निवेदन अक्राळे फाटा ते ओझर रस्त्याबाबत निवेदन
बापू चव्हाण दिंडोरी
अक्राळे फाटा ते अक्राळे गाव, तसेच अक्राळे फाटा ते राघोजी भांगरे चौक (ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ) या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी,या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अक्राळे फाटा ते अक्राळे गाव,तसेच अक्राळे फाटा ते राघोजी भांगरे चौक (ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ) हे रस्ते विकास योजना सन २००१ -२०२१ अन्वये इजिमा १९७ व ग्रामा १५ दर्जाचा आहे.सदर रस्ता हा ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ,मुंबई ते आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रं.३ नाशिक,दिंडोरी प्रमुख राज्य मार्ग क्रं. ०३ ला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. सदरील रस्ता हा अक्राळे एमआयडीसी (औद्योगिक क्षेत्र) ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे.तसेच सदर रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. सदर रस्ता आदिवासी क्षेत्रातुन अक्राळे एमआयडीसी,पालखेड एमआयडीसी,जानोरी एमआयडीसी, खतवड एमआयडीसी,सहयाद्री फॉर्म ही महत्त्वाचे ठिकाणे आहेत.
त्यामुळे शेतकर्यांच्या दृष्टीने व शेत मालाच्या हितासाठी या मार्गाचा उपयोग होत असल्याने सदर मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.सदर रस्त्यावर सह्याद्री फॉर्म ही नामांकित कंपनी आहे. या कपंनीचे क्षेत्रफळ १०० एकरपेक्षा जास्त आहे.१५००० पेक्षा जास्त शेतकरी शेतीमालाचे विक्री करतात. ही कंपनी ४२ पेक्षा जास्त देशामध्ये माल निर्यात करते. या कंपनीत टोमॅटोवरील प्रक्रिया करणारे भारतातील सर्वात मोठे युनिट आहे. तसेच द्राक्षे निर्यात करणारे भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.या कंपनीत २५ पेक्षा जास्त फळभाज्यावर प्रक्रिया केली जाते. सदरचा रस्ता हा ओझर विमानतळाकडे जाणारा जवळचा पालखेड धरण आहे.त्यानंतर या मार्गावर दिंडोरीत श्री स्वामी समर्थ केंद्र व करंजी येथील प्रसिध्द श्री गुरुदेव दत्तांचे आजोळ असल्यांने भाविकांची वर्दळ जास्त आहे.तसेच अक्राळे,पालखेड,जानोरी,खतवड आदी एमआयडीसी या परिसरात असणारे वेगवेगळे उद्योजकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे कामास सिंहस्थ कुंभमेळा मधुन प्रस्तावित करुन मंजुरी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे..
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा