Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ एप्रिल, २०२६
चोरडिया कुटुंबीयांकडून पाडे ग्रामपंचायतीला वैकुंठ रथ भेट.
बापू चव्हाण दिंडोरी
दिंडोरी येथील उद्योजक कै.माणकलाल मोतीलाल चोरडिया यांच्या स्मृतीदिनानिमित्त व कै. कमलेश माणकलाल चोरडीया यांच्या जयंतीनिमित्त चोरडिया कुटूंबियांनी पाडे ग्रामपंचायतीला वैकुंठ रथ भेट दिला.
कै.माणकलाल चोरडिया व कै. कमलेशशेठ चोरडिया यांचे संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी झोकून दिले . गोरगरीबांना ते मदत करायचे. त्यांच्या व्यवसायातील नफा सुध्दा गरीबांना खर्च करायचे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी राजेश चोरडिया, अमित चोरडिया व सुमित चोरडिया यांनी सोयीसुविधायुक्त वैकुंठ रथ तयार केला व पाडे ग्रामपंचायतीला पारसबाई माणकलाल चोरडिया, वैशाली कमलेश चोरडिया, सविता चोरडिया यांच्या हस्ते वैकुंठ रथ भेट देण्यात आला.याप्रसंगी संतोष रांका, कैलास देशमुख,वसीम शेख, भाऊसाहेब देशमुख,सरपंच नरेंद्र पेलमहाले, राजेंद्र पगारे,एजाज शेख, संतोष घोरपडे,संदीप पगारे, साहेबराव पवार आदी उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा