Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ एप्रिल, २०२६
बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ तारखेला पहाटे सुमारे २:२५ वाजण्याच्या सुमारास पातोंडा गावाजवळ अमळनेर रस्त्यावर करण्यात आली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे व विनोद संदानशिव हे पेट्रोलिंग करत असताना समोरून येणारा ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ एपी ८८३२) संशयास्पद आढळला. चालक निलेश रुपचंद बोरला (वय ३०, रा. दुगाणी, ता. वरला, जि. बडवाणी, म.प्र.) हा वाळूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे तपासात समोर आले.
पोलिसांनी त्याच्याकडे परवान्याची चौकशी केली असता कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. त्यामुळे चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करत आहेत.
या कारवाईत अंदाजे ४ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि सुमारे ३ हजार रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा