Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ एप्रिल, २०२६
Home
/
/
वरखेडा ‘ग्राम आरोग्य कृती समिती’ची स्थापना; केशव वाघले राजेंद्र उफाङे बाळासाहेब अस्वले यांची सदस्यपदी निवड .
वरखेडा ‘ग्राम आरोग्य कृती समिती’ची स्थापना; केशव वाघले राजेंद्र उफाङे बाळासाहेब अस्वले यांची सदस्यपदी निवड .
बापू चव्हाण दिंडोरी
तालुक्यातील वरखेडा येथे नुकतीच ‘आंतरविभागीय समन्वय बैठक’ उत्साहात पार पडली.या बैठकीत गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत ग्राम आरोग्य कृती समिती’ची स्थापना करण्यात आली.
या समितीमध्ये सरपंच केशव
वाढले,उपसरपंच राजेंद्र उफाडे पत्रकार प्रतिनिधी म्हणून बाळासाहेब अस्वले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेचा श्रीगणेशा प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी तथा महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापराव देशमुख यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.महाराष्ट्र शासनाच्या ‘माझं गाव,आरोग्य संपन्न गाव’ या मोहिमेची सविस्तर माहिती देतानाच त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ‘ग्रामगीता’ या ग्रंथातील विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामगीता हा ग्रंथ दीपस्तंभासारखा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
महाराष्ट्र स्वाभिमानी जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अभिजीत घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरखेडा गाव या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून,बक्षीस मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. देशमुख यांनी दिले.तसेच ३० एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची रूपरेषाही यावेळी स्पष्ट करण्यात आली."गावाचा आरोग्य स्तर उंचावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून काम करणे आवश्यक आहे.वरखेडा गावाला आदर्श करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
बैठकीदरम्यान विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या.या समन्वय समिती मध्ये सरपंच केशव वाघले, उपसरपंच राजेंद्र उफाडे, ग्रामपंचायत सदस्य चिंधू लिलके,समाधान गायकवाड शारदा भगरे,केदु ससाणे,
पोलीस पाटील कैलास बलसाने ,
ग्रामविकास अधिकारी भास्कर पाडवी,आशा सेविका,नंदाबाई भगरे
कमलाकर वाघेरे शिक्षक प्रतिनिधी चंद्रकला गांगुर्डे अंगणवाडी कार्यकर्ते
पंकज उफाडे,पत्रकार प्रतिनिधी बाळासाहेब अस्वले,प्रवीण कराटे,डॉ. पी.बी.देशमुख आदींचा समावेश करण्यात आला आहे.या निवडीबद्दल आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल वरखेडा परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा